विद्यार्थ्यांनी कठीण काळात खचून न जाता कठोर परिश्रम घेणे महत्त्वाचे---माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील
के.बी.रोहमारे स्मृती करंडक राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी.नगराध्यक्ष. मंगेश पाटील यांचे हस्ते संपन्न
कोपरगाव प्रतिनिधी:------
के. बी. रोहमारे स्मृती करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे अत्यंत नेटके नियोजन व धर्म निरपेक्ष जाणताराजा शिवछत्रपती हा अतिशय कालसापेक्ष विषय असल्याने इथे आल्यानंतर मला माझ्या बालपणातील मिलिट्री स्कूल मधील शिस्तबद्ध जीवनाची आठवण झाली. कारण त्या स्कूलचे चेअरमन उदयनराजे भोसले होते व त्यामुळे माझ्या रोमा-रोमात भिनलेला शिव- विचार स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला. हा क्षण माझ्यासाठी भाग्याचा आहे. असे प्रतिपादन कोपरगावचे माजी नगराध्यक्ष मा. मंगेश पाटील यांनी यावेळी केले. के. जे. सोमेया वरिष्ठ व के. थी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या यतीने आयोजित के.बी. रोहमारे स्मृति राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी को. ता. एज्यु. सोसायटीचे सचिव ॲड.संजीव कुलकर्णी हे होते तर को. ता. एज्यू सोसायटीचे विश्वस्त संदीप रोहमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटील पुढे म्हणाले की, राजकारणात असूनही मला सर्व जातीधर्माबद्दल प्रचंड आदर आहे. त्याचे कारणही बालवयापासून भिनलेला शिवविचारच आहे. आज या ठिकाणी ४८ स्पर्धकांतून ज्यांना पारितोषिके प्राप्त झाले त्यांच्या कठोर परीश्रमाचेच हे फलित आहे. त्यांच्या व स्पर्धेचे उद्घाटक डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन इतर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी देखील पुढील वर्षी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविल्यास स्पर्धेचा हेतू खन्या अर्थाने साध्य होईल. उत्तम बोलायचे असेल तर उत्तम व भरपूर वाचन करावे लागते. वक्तृत्वासाठी भाषा व शैली विकसित करावी लागते. या सर्वांचा उपयोग जीवन घडवण्यास होतो. आजचा विद्यार्थी वर्ग कठिण काळातून मार्गक्रमण करीत आहे. तरीही त्यांनी खचून न जाता जीवनात खूप पुढे जाण्यासाठी कठोर परिश्रम केले पाहिजेत. कोपरगाव परिसरातील पालक उच्च शिक्षणासाठी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करतांना सोमैया महाविद्यालयाची अग्र क्रमाने निवड करतात ही सोमेया महाविद्यालयाच्या लौकिकाची पावती आहे.
यावेळी ॲड.. संजीव कुलकर्णी म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यामध्ये वक्तृत्व गुणांचा विकास व्हावा व विचारमंथन करून त्यांना नीट व्यक्त होता यावे यासाठी १९९० नंतर खंडित झालेल्या भि. ग. रोहमारे वादविवाद स्पर्धेचे आम्ही नव्या रुपाने पुनरुज्जीवन केले. त्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपन्यातील बहुसंख्य स्पर्धकांनी भाग घेऊन आमच्या स्पर्धेला मुल्य प्राप्त करून दिले त्याबद्दल मी सर्व स्पर्धकांना धन्यवाद देतो. या पुढेही या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.
या स्पर्धेत के. बी. रोहमारे करंडकाचे मानकरी विनायकराव पाटील महाविद्यालय, वैजापूर (औरंगाबाद), कु. तृप्ती अर्जुन थोरात व कु. जयश्री रावसाहेब आहेर तर वैयक्तिक प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रु. १०,०००/- ची मानकरी कु. प्रणाली पांडुरंग पाटील, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय वारणानगर (फोल्हापूर), द्वितीय पारितोषिक रु.७०००/- चा मानकरी सारांश धनंजय सोनार (डॉ. आंबेडकर अध्यासन, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव), तृतीय पारितोषिक रु.५०००/- चे मानकरी विभागून साईनाथ नामदेव महाद्वाड (यशवंत महाविद्यालय नांदेड व फु रूचिका विकास चौधरी, जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी) तर अवधूत भगवान पाटील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे य संतोष सर्जेराव शिंदे क्रिस्टोन अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे) यांनी प्रत्येकी रु.१००१/- चे उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले.
पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी केले. परीक्षण प्रा. डॉ. शांताराम चौधरी, प्रा. डॉ. बाळासाहेब औताडे व प्रा. निलेश गायकवाड यांनी केले. पारितोषिकांची घोषणा स्पर्धा संयोजक डॉ. जिभाऊ मोरे यांनी केली. उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा. विजय ठाणगे यांनी मानले. तर सूत्रसंचालन डॉ. शैलेंद्र बनसोडे व प्रा. अशोक सूर्यवंशी यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. बी. एस. गायकवाड, प्रा.आर.ए. जाधव, डॉ. एस. एल. अरगडे, प्रा.एम. बी. खोसे, डॉ. व्ही. एस. साळुंके, डॉ. बी. डी. गव्हाणे व डॉ. एन. टी. ढोकळे, रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे आदीनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments