आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

शहरातील अतिक्रमण काढून १० मार्च ला ११ वर्ष पूर्ण, कधी करणार? विस्थापितांचे पुनर्वसन. माजी.नगराध्यक्ष. मंगेश पाटील.

  शहरातील  अतिक्रमण काढून १० मार्च ला ११ वर्ष पूर्ण, कधी करणार? विस्थापितांचे पुनर्वसन.      माजी.नगराध्यक्ष. मंगेश पाटील.

           कोपरगाव प्रतिनिधी:---- ज्या विकासाच्या नावावर अतिक्रमण काढले , तो विकास  झालाच नाही , ना रस्ते मोठे झाले, ना गोरगरिबांना विस्थापिताना गाळे , खोका शॉप , बेघराना राहायला जागा मिळाली .

 कधी देणार खऱ्या विस्थापितांना खोका शॉप , गाळे व जे राहात होते त्यांना घरासाठी जागा? असा संतप्त सवाल माजी नगराध्यक्ष मंगेश राव पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे येत्या ११ मार्चला कोपरगाव शहरातील अतिक्रमण काढून अकरा वर्षे पूर्ण होतील मात्र

     खरच विकासासाठी अतिक्रमण काढले?  मग आज अखेर सर्वे रस्ते मोठे करून रुंदीकरण होऊन ,रस्त्याच्या कडेला पेविंग ब्लॉक , किंवा पाई चालणाऱ्या नागरिकांसाठी , मुलांसह जेष्ठनागरीकांसाठी  रस्त्याचे कामे कुठे झालेत ? धूळ मात्र गावभर उडत आहे. असा सवाल उपस्थित करून याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले की,

धारणगावं रोड , येवला रोड , बाजारतळ , बस स्टँड समोरील जागा , बैलगाडी तळ , मार्केट कमिटी समोरील रोड , इंदिरापथ , बैल बाजार रोड ,बस स्टँड / खंदक नाला रोड , मच्छी मार्केट , तहसील कार्यालय लगत, पोस्ट ऑफिस मागील भागात , नदीकाठ रोड , चौक ते  एम.एस.सि.बी. ( mseb) ऑफिस ते कोर्ट ईत्यादि अनेक भागातील छोटे दुकाने पाडून या ठिकाणी रस्ते आहे तसेच आहे.जागा तसाच पडल्या आहेत.

    आज पर्यंत  विस्थापित आशेवर राहिले व नागरिक मोठे रस्ते होऊन गाव वाढेल , स्वछ होईल , धूळ मुक्त होईल या आशेवर होते .शहरातील  नागरपालिकेच्या, शासनाच्या, जिल्हा परिषदेच्या  वेगवेगळ्या असणाऱ्या जागेवर शॉपिंग सेन्टर कधी होतील याची वाट नागरिक बघत होते.काहीच झाले नाही.

        खऱ्या विस्थापिततांची होळी झाली. भेघर झाले . महिला , मुले बाळे आक्रोश करून  रडत होती , कसे होणार आपले , काही गाव सोडून गेले , काही कर्जबाजारी झाले , काही मेले , काही दुसऱ्या च्या हाताखाली काम करून कसे बसे कुटुंब चालवत आहेत , याच आशेवर की कधी तरी न्याय मिळेल व आपल्याला हक्काचे खोका शॉप , गाळा मिळेल , राहायला जागा मिळेल, पक्के घर मिळेल.

 ना रस्ते मोठे झाले ना गाळे झाले ना शॉपिंग सेन्टर झाले.

  जसे टिळक नगर च्या रोड च्या बाजूने व इंडोर गेम हाॅल  च्या बाजूला पत्र्या चे गाळे झाले , तसे छोटे छोटे गाळे होऊ शकतात, रस्ते छोटे न होऊ देता. 

 खरे तर हे सर्वे विस्थापित नगरपालिके च्या आशेवर आज अखेर आहेत की काही तरी होईल  , करतील व नागरिकांना वाटले की मोठे रोड होतील , साईड पट्ट्या होतील , धूळ कमी होईल , गाळे होतील , परंतु फक्त आणि फक्त निराशा या दोघांच्या पदरी पडली ,आली.

        दोन वर्षांपूर्वी ४/९/२०२० ला श्रमिकराज  कामगार संघटने बरोबर, अजय विघे , गणेश शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यां च्या बरोबर  नगरपालिकेला निवेदन ही दिले होते. तरी अजूनही नगरपालिकेने खरे विस्थापित यांची शहानिशा करून टप्याटप्याने का होईना , जसे जिथे शक्य होईल तिथे खोका शॉप , गाळे बांधून , ज्यांची घरे गेली त्यांना राहायला जागा देऊन, या विस्थापिताना न्याय मिळवून द्यावा.अशी  विनंती देखील माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी शेवटी नगर  पालिका प्रशासनाला केली आहे.

Post a Comment

0 Comments