नाटेगाव सोसायटीच्या चेअरमनपदी काळे गटाचे गणेश मोरे व्हा. चेअरमनपदी सौ. भारती पिंपळे यांची बिनविरोध निवड
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:---- कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव विविध सेवा सोसायटीच्या चेअरमन, व्हा. चेअरमन पदाची निवडणूक नुकतीच पार पडली असून या निवडणुकीत काळे गटाचे गणेश वसंतराव मोरे यांची चेअरमनपदी तर सौ. भारती राऊसाहेब पिंगळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या नाटेगाव सोसायटीची सत्ता मागील ३८ वर्षापासून काळे गटाच्या ताब्यात आहे. माजी आमदार अशोकराव काळे व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या निवडणुकीत काळे गटाचे १० सदस्य निवडून येवून पुन्हा एकदा सोसायटीवरील काळे गटाने सत्ता राखली आहे. सोसायटीच्या चेअरमन, व्हा. चेअरमनपदासाठी निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत चेअरमनपदासाठी गणेश वसंतराव मोरे व व्हा. चेअरमनपदासाठी सौ. भारती राऊसाहेब पिंगळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. चेअरमन, व्हा. चेअरमनपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज मुदतीच्या आत दाखल झाल्यामुळे निवडणूक अधिकारी आर.एन गांगुर्डे यांनी गणेश वसंतराव मोरे यांची चेअरमनपदी तर सौ. भारती राऊसाहेब पिंगळे यांची व्हा. चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.निवडणूककामी सोसायटीचे सचिव दत्तात्रय वाघ यांनी मदत केली. यावेळी उपस्थित असलेल्या नवनिर्वाचित संचालकांनी व काळे गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. मोरे बाळू पोपट, मोरे सतीश कारभारी, मोरे अंबादास धोंडीबा, मोरे घमा सुकदेव, सौ. मोरे लीलाबाई तान्हाजी, सौ. मोरे रंजना रघुनाथ, मोरे संतोष इंद्रभान, भालके भरत छबुराव आदी सदस्यांसह काळे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन गणेश मोरे व व्हा.चेअरमन सौ. भारती पिंगळे यांचे माजी आमदार अशोकराव काळे व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी अभिंनदन केले असून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
0 Comments