आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

अतिक्रमण काढल्याचं, तुमच्या डोक्यावरच पाप दुसऱ्याच्या माथी मारू नका – धनंजय कहार

अतिक्रमण काढल्याचं, तुमच्या डोक्यावरच पाप

 दुसऱ्याच्या माथी मारू नका – धनंजय कहार कोपरगाव प्रतिनिधी:-----  मागील अनेक वर्षापासून छोटे-मोठे व्यवसायिक सामंजस्यपणे कोपरगाव शहरातील मोकळ्या जागेवर आपले व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत होते. मात्र अनधिकृतपणे अतिक्रमण पण करायचे आणि सत्तेच्या जोरावर कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात जावून मारहाण देखील करायची असे दुष्कृत्य माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांनी केले. त्यांच्यामुळे कोपरगाव शहराच्या अतिक्रमणाचा विषय थेट जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत जावून  कोपरगाव शहरातील अतिक्रमण नगरपरिषद प्रशासनाने काढले आहे. त्यामुळे कोपरगाव शहराच्या अतिक्रमणाचा मुद्दा चर्चेत आणायचे काम कुणी केले? कुणामुळे अतिक्रमण काढली जात आहे? हे जरा एकदा आपल्या मनाला विचारा. मात्र तुमच्या डोक्यावरच पाप दुसऱ्याच्या माथी मारू नका असा उपरोधिक सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपशहराध्यक्ष धनंजय कहार यांनी माजी उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी यांना  दिला आहे.


                     रस्त्यावर वाहतुकीसाठी होत असलेल्या अडचणीमुळे कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाने रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांना रस्त्यावर रहदारीसाठी अडचण निर्माण करू नये अशी विनंती केली होती. मात्र काही दुकानदार आपले दुकान असतांना देखील रिकाम्या जागेवर अतिक्रमण करून वाहतुकीला अडचण निर्माण करीत होते. त्यामुळे आमची हि नियमित कारवाई असल्याचे कोपरगाव नगरपरिषद प्रशासन व पोलीस प्रशासनाने सांगितले आहे. परंतु कोणत्याही गोष्टीत राजकारण करायची सवय असलेल्या विरोधकांनी कुठलाही संदर्भ कुठेही जोडून व्यवसायिकांच्या मनात विष पेरण्याचे काम करत आहे. वास्तविक पाहता आजच्या परिस्थितीत अशा प्रकारचे कुटील राजकारण करणे योग्य नसतांना आपल्या कार्यकर्त्यांमार्फत ना. आशुतोष काळे व काळे कुटंबाबद्दल नागरिकांमध्ये चुकीचा गैरसमज पसरविला जात आहे. त्यामुळे नाईलाजास्तव नागरिकांमध्ये गैरसमज पसरू नये यासाठी खुलासा करावा लागत आहे. कोपरगाव शहरात सर्वात जास्त अतिक्रमण कुणाची आहेत याची शहरातील नागरिकांना चांगली कल्पना आहे. कोपरगाव शहरात अतिक्रमणावरून वाद कुणाचे झाले आहे हे त्यांनी सांगावे. तसेच शहरातील अतिक्रमण काढावे म्हणून कोपरगाव नगरपरिषदेकडे अर्ज कुणी केले हे पण त्यांनी सांगितले पाहिजे. उगाचच पराचा कावळा करून नागरिकांमध्ये विष पेरण्याचे काम करू नये. काही महिन्यांपूर्वी कोपरगाव शहरात अतिक्रमण काढल्याच्या रागातून माजी उपनराध्यक्षसह एका माजी नगरसेवकाने पालिकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण करून मर्दुमकी गाजविली.त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.


          पालिका अधिकाऱ्यांनी झालेली मारहाण सहन करून झालेला अपमान गिळला असला तरी २२ मार्च रोजी माजी नगरसेवकांना अपात्र ठरविणे बाबत जिल्हाधिकाऱ्यांसमोर झालेल्या सुनावणीत मारहाण झालेले मुख्याधिकारी गोरडे व डोईफोडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर झालेला प्रकार इंतभुत मांडला. त्यामुळे अतिक्रमणाच्या मुद्याने उचल खाल्ली व त्याची मोठी किंमत आज हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यवसायिकांना मोजावी लागत आहे.त्यामुळे कोपरगाव नगरपरिषद प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून काढण्यात येत असलेले अतिक्रमण, हे पाप तुमचेच आहे. ते दुसऱ्याच्या माथी मारून राजकारणाची पोळी भाजू नका असा सल्ला देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपशहराध्यक्ष यांनी माजी उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी यांना  दिला आहे.

Post a Comment

0 Comments