कोपरगाव शहरातील नागरिकांच्या वतीने ना. आशुतोष काळेंचा जाहीर नागरी सत्कार
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:---- ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधीची प्रशासकीय मंजुरी
मिळवून कोपरगाव शहराच्या नागरिकांना वर्षानुवर्षापासून भेडसावत असलेला पाणी प्रश्न निकाली काढण्यात श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी यश मिळविले आहे.त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांच्या वतीने त्यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती नामदार आशुतोषदादा काळे मित्र मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
कोपरगाव शहरातील नागरिक मागील अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याच्या समस्येने त्रासलेले होते. विशेषत:महिला भगिनींना याचा मोठा त्रास होत असल्यामुळे दैनंदिन सर्व कामे बाजूला ठेवून पिण्याचे पाणी उपलब्ध कसे होईल यासाठी त्यांचा बहुतांश वेळ जात असे. हि समस्या कोपरगावकरांसाठी नित्याचीच झाली होती. त्यामुळे सहन केल्याशिवाय गत्यंतर नव्हते. शहरातील नागरिकांना पाण्याच्या समस्येमुळे होत असलेल्या त्रासाची दखल घेवून ना. आशुतोष काळे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील शहराचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी ५ नंबर साठवण तलावाच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील होते.
मात्र सत्ता नसल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही. परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शहरातील जनतेला पाणी प्रश्न सोडविण्याचा शब्द दिला होता. त्या शब्दपूर्तीसाठी त्यांनी आपले राजकीय वजन खर्च करून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधीची प्रशासकीय मंजुरी मिळविली आहे. हि अशक्यप्राय गोष्ट त्यांनी करून दाखवत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या वतीने शुक्रवार (दि.०१) रोजी सायंकाळी ५.०० वा. ना. आशुतोष काळे यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या सत्कारासाठी नागरिकांनी व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नामदार आशुतोषदादा काळे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले
0 Comments