सुरेश (नाना )भालेराव यांचे दुःखद निधन.
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:-----
कोपरगाव शहरातील सर्वांना सुपरिचित असलेले सुरेश भालेराव तथा नाना भालेराव (वय ६१) यांचे आज मंगळवार रोजी सकाळी ७-०० वा.राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन झ़ाले. त्यांच्या पश्चात पत्नी शैलजा सुरेश भालेराव मुलगा स्वप्निल, मुलगी सायली देशपांडे, भाऊ सुनील,सतिष भालेराव, बहिण सुलभा मुंगिकर सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.ते १९८३साली कोपरगाव तहसील येथे क्लार्क म्हणून नोकरीस लागले. संगमनेर येथे बराच कार्यकाळ नायब तहसीलदार,प्रांतकार्यालय, तसेच श्रीरामपूर, राहुरी, राहाता व शेवटी शिर्डी प्रांत कार्यालय येथे नायब तहसीलदार म्हणून रिटायर झाले त्यांची कामाची दखल घेत त्यांना अनेक स्वरूपाचे महसूलचे पुरस्कार मिळाले होते तसेच रिटायर झाल्यानंतर श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथे ते मालमत्ता विभागात कार्यरत होते.
भालेराव नाना हे अत्यंत मितभाषी साध्या-सरळ स्वभावाचे होते त्यांनी आपल्या प्रशासकीय कार्य कालामध्ये अनेक उपेक्षित गोरगरीब जनतेची कामे मार्गी लावली सामान्य मध्ये त्यांची एक वेगळी छबी होती.
त्यांचा अंत्यविधी कोपरगाव अमरधाम येथे दुपारी ४.०० वाजता होणार आहे. तसेच येथील ब्राह्यण सभा कोपरगांवचे ते आधारवड होते.
0 Comments