५ नंबर साठवण तलावाला निधी ना.आशुतोष काळेंची कामगिरी सुवर्णाक्षरांनी लिहिली जाणार – डॉ. सौ. वर्षा झंवर
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:---- कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी ५ नंबर साठवण तलावाच्या कामासाठी १३१.२४ कोटी निधीला मिळविलेली प्रशासकीय मंजुरी ही अतुलनीय कामगिरी आहे. महिला भगिनी मागील काही वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करीत होत्या. यापुढे त्यांची होणारी वणवण थांबणार आहे. एक महिला म्हणून याचा मला विशेष आनंद होत असून ना. आशुतोष काळेंची हि कामगिरी कोपरगावच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाणार असल्याचे लायनेस क्लबच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. सौ. वर्षा झंवर यांनी म्हटले आहे.
डॉ. सौ. वर्षा झंवर यांनी पुढे असे म्हटले आहे की, २०१९ च्या निवडणुकीच्या पूर्वीपासून ना. आशुतोष काळे ५ नंबर साठवण तलावासाठी करीत असलेला संघर्ष कोपरगावची जनता जाणून आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या धरणे आंदोलनाला कोपरगाव शहरातील नागरिकांनी बंद पाळून आम्ही तुमच्या सोबत असल्याची ग्वाही ना. आशुतोष काळेंना दिली होती. परंतु सत्ता नसल्यामुळे त्यांचे हात बांधलेले असल्यामुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सत्ता द्या तुमचा पाणी प्रश्न सोडवून दाखवितो अशी साद त्यांनी शहरातील नागरिकांना दिली होती.
२०१९ च्या निवडणुकी मतदार संघातील जनतेचे आशीर्वाद त्यांना मिळाले. त्यामुळे मिळालेल्या संधीचा फायदा घेत व शहरवासीयांना दिलेल्या शब्दाची जान ठेवून त्यांनी निवडून येताच ५ नंबर साठवण तलावाचे प्राथमिक स्वरूपातील खोदाईचे काम पूर्ण करून आश्वासक सुरुवात केली होती. त्यानंतर पुढील कामासाठी निधी मिळावा यासाठी त्यांनी केलेल्या अथक पाठपुराव्यातून टप्याटप्याने एकेक मंजुरी मिळवत अखेर १३१.२४ कोटी रुपये निधीला त्यांनी प्रशासकीय मंजुरी मिळवली हे त्यांच्या अथक प्रयत्नाचे फलित आहे. कोपरगाव शहरवासीयांसाठी हा भाग्याचा क्षण असून ना. आशुतोष काळे यांची हि कामगिरी कोपरगाव शहराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाणार असल्याचे डॉ. सौ. वर्षा झंवर यांनी म्हटले आहे.
0 Comments