आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

ना. आशुतोष काळेंनी जागरूक राहून दिलेला शब्द पूर्ण केला- अॅड.विद्यासागर शिंदे


ना. आशुतोष काळेंनी जागरूक राहून दिलेला शब्द पूर्ण केला- अॅड.विद्यासागर शिंदे



 कोपरगाव प्रतिनिधी:----  राजकारणात आश्वासन दिली जातात मात्र दिलेली आश्वासन बोटावर मोजण्या एवढेच    राजकारणी दिलेला शब्द पूर्ण करतात त्यापैकी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे हे एक आहेत.   त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुक प्रचाराच्या वेळी पाणी प्रश्न सोडविण्याचा दिलेला शब्द जागरूक राहून पूर्ण केला असल्याचे कोपरगाव तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.विद्यासागर शिंदे यांनी म्हटले आहे.

मागील अनेक वर्षापासून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न भिजत पडला होता. कधी सहा दिवसांनी तर कधी आठ दिवसांनी उन्हाळ्यात तर सोळा दिवस नळाची आणि पाण्याची गाठ पडत नव्हती अशी भिषण परिस्थिती कोपरगाव शहराच्या पाणी पुरवठ्याची झाली होती. याचा शहरातील नागरिकांना विशेषतः महिला भगिनींना  मोठा त्रास सहन करावा लागत होता.आज पर्यंत शहरातील नागरिकांच्या पदरात आश्वासनाशिवाय काहीच पडले नव्हते. पाणी प्रश्न सोडविण्याची अनेकांनी आश्वासन दिली मात्र हि आश्वासनं  हवेतच विरली गेली त्यामुळे कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न जैसे थे होता.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकी पूर्वी कोपरगाव शहराची तहान कायमची भागविण्यासाठी पाच नं साठवण तलावाची गरज असून साठवण क्षमता वाढल्यानंतर निश्चितपणे पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे ना.आशुतोष काळे यांच्या लक्षात आल्यामुळे ५ नं. साठवण तलाव व्हावा यासाठी ते आग्रही होते. त्यामुळे त्यांनी निवडणुक प्रचाराच्या वेळी ५ नं. साठवण तलावाच्या माध्यमातून पाणी प्रश्न सोडविण्याचा शब्द दिला होता. दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी त्यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न करून राज्यसरकार मध्ये असलेले आपले वजन वापरून ५ नं. साठवण तलावाच्या कामासाठी १३१.२४ कोटी निधीला प्रशासकीय मान्यता मिळविली. कोपरगाव शहरातील जनतेच्या दृष्टीने हि अतिशय दिलासा देणारी बाब आहे. कोपरगावचा पाणी प्रश्न मार्गी लावणे सोपे काम नव्हते त्यामध्ये अनेक अडथळे होते मात्र हि अडथळ्यांची शर्यत जिंकण्यात ना. आशुतोष काळे यशस्वी झाले असून त्यांनी जागृत राहून आपला शब्द पूर्ण केला आहे अॅड.विद्यासागर शिंदे यांनी शेवटी म्हटले आहे.


                               


              

Post a Comment

0 Comments