आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

माझे आधारवड हरपले.. स्नेहलता कोल्हे, भाजप , प्रदेश सचिव

 माझे आधारवड हरपले..

 स्नेहलता कोल्हे, भाजप , प्रदेश सचिव  कोपरगाव प्रतिनिधी----

साहेब आपल्यात नाहीत ही कल्पनाही करवत नाही पण रोज दिवसाची सुरवात झाल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत साहेबांचा दिनक्रम आठवून त्यांची उणीव जाणवते..

मी कोल्हे कुटूंबाची सून म्हणून त्यांनी कधीच मला समजले नाही तर मला आयुष्यभर मुलगी म्हणूनच जपले,कौटूंबिक असो की राजकीय जीवनात माझ्या चेहऱ्यावर नाराजी साहेबांना बघवली नाही.त्यांचा घरातील रोजचा वावर,साहेबांनी मला केलेले मार्गदर्शन,माझ्यावर टाकलेला विश्वास ही फार मोठी गोष्ट होती,साहेब नसणे ही माझ्यासाठी खूप मोठी हानी आहे मला आता साहेबांची आशीर्वादरुपी हाक कानावर पडणार नाही,परंतू आपण मला दिलेल्या आशिर्वादावर माझी पुढची सामाजिक व राजकीय वाटचाल कायम राहील.साहेबांनी आशीर्वाद देताना डोक्यावर ठेवलेला हाताचा भरभक्कम आधार रोज जाणवत राहील..

“स्नेहा तू खूप काम केले अगदी माझ्या पेक्षाही जास्त तू मतदारसंघात काम केले पण राजकीय काड्या आणि खोड्या ओळखायला तू कमी पडलीस काळजी करू नको असे प्रसंग आयुष्यात येतात त्याकडे दुर्लक्ष कर आणि लढत रहा मी तुझ्या सदैव पाठीशी आहे.” साहेब तुम्ही माझ्या पाठीशी असाल याची मला खात्री आहे तुम्ही शरीराने आमच्यात नसाल पण तुमच्या आशीर्वादाने आणि संस्कारांनी रोज मला प्रेरणा देत रहाल.मला माहित होते कार्यरत रहाणे,वेळ सांभाळणे तुम्हांला आवडायचे तो मी प्रयत्न केला.विधानसभेत निसटता पराभव झाला,आपल्या समोर हे व्हायला नको होते ही खंत मला कायमच वाटते.

मला कायम आठवतात साहेबांचे ते वाक्य जेव्हा मी आमदारकीच्या काळात खूप मनापासुन काम केले त्यानंतर दुसऱ्या निवडणुकीत आलेला अनपेक्षित निकालाने मला थोडं वाईट वाटलं की आपण तर खूप काम केले पण तरीही राजकारण समजायला मी कमी पडले त्यावेळी साहेब म्हणाले न डगमगता काम करत रहा मी कायम तुझ्या पाठीशी आहे.

        आपल्या राजकीय जीवनात आपण स्पष्टवक्ते होतात.पोटात एक ओठात एक असे कधीच केले नाही,आपण समोरुन लढलात,कुणाच्या पाठीत खंजीर खुपसणे हे कृत्य आपल्याकडून घडले नाही,खुल्या दिलाने अनेकांना मोठे केले, मदत केली अनेकांनी आजही कृतज्ञता जपली.

साहेब कायम मी म्हणायचे तुम्ही काळजी घ्या आता समोर तुम्ही नसाल पण तरीही साहेब काळजी घ्या असे शब्द बाहेर पडताय,कारण तुम्ही थोडेही आजारी झालात तर आमचा जीव कासावीस व्हायचा.तुम्हाला ठीक होऊन बघण्यासाठी आता तुमच्या खोलीचा दरवाजा उघडून पाहिले तर आतमध्ये तुम्ही दिसणार नाहीत.जेवणावेळी तुमची खुर्ची रिकामी दिसेल मला.तुमची आदरयुक्त धाक असलेली गाडी कुणालाही दिसली तर तुम्ही रोजच्याप्रमाने आलात असाच भास होईल यापुढे.

     साहेब अश्रूंशिवाय आज काहीच नाही आणि तुमच्या आशीर्वादा सारखे माझ्यासाठी मोठे पुण्य नाही.साहेब तुमच्या कमतरतेने मनात एकच काहूर आहे की आता माझे आधारवड हरपले.एक चालते बोलते विद्यापीठ हरवले.जिद्द आणि संघर्षाचा हिमालय हरवला.मायेचा आणि आपुलकीचा समुद्र आटला.मी जनतेची लोकप्रतिनिधी झाले तर आपण मला अहोजावो करत,या आमदारताई बसा म्हणत परंतू मला तुम्ही दिलेला हा आदर पाहून मला कसेतरी होत व तुमच्या या उदार स्वभावाचा प्रचंड अभिमानही वाटत,किती तो मोठेपणा,आदर आपण माझ्या प्रत्येक कामात शाबासकी देत होता.    

         कोपरगांव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठीही माझी धडपड आपण पाहत,मी तुमच्या बरोबर मंत्रालयात येईल काही अडचण आली तर सांग असा आधार देत.शेतकरी,पाणी प्रश्न यासाठी या वयात देखील आपण मंत्रालयात मिटींगला आलात,आपण थकलोही नाही आणि थांबलोही नाही.भाऊ आपण समाजातील  गोर-गरीब,दीनदलित,वंचित सर्व समाज घटकांसाठी,जातीधर्मासाठी आयुष्यभर लढलात,सर्व कार्यकर्त्यांना जीवापाड जपले.कोरोना कार्यकाळात कुणाकडे जाता येत नव्हते,कुणी तुम्हांला भेटण्यासाठी येऊ शकत नव्हते हा अतिशय कठीण काळ होता.आपण कायमच जनतेच्या सुख-दु:खात साथ दिली त्या काळात अनेक जीवाभावाचे कार्यकर्ते सोडूनही गेले.काही परिवारांवर अकस्मीत संकटे आली त्यावेळी आम्ही आपल्या आशिर्वादाने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा अटोकाट प्रयत्न केला.विवेकभैय्यानी व आम्ही सर्वांनी कोरोना रुग्णांना मानसिक,भावनिक,आर्थिक आधार दिला त्यावेळी आपण आमची पाठ थोपाटली कारण तुम्ही आयुष्यभर जनसेवेचा जपलेला वसा आम्ही समर्थपणे जपण्याचा प्रयत्न करतोय याचा अभिमान तुमच्या चेह-यावरती दिसला.

भाऊ मी कोरोनात मृत्युशी संघर्ष केला त्यातून वाचले.तीन आठवडे ऑक्सिजनवर होते यावेळी आपला जीवनपट समोर यायचा,आपण आयुष्यभर कितीतरी संघर्षांला सामोरे गेलात तरीही न डगमगता घडलात.आपल्याला तर जन्मदाती आई सुद्धा आठवत नव्हती,बरेचसे जवळचे नातेवाईक प्लेगच्या साथीने गेले होते,तरीही हतबल झाला नाहीत.याउलट जिद्दीने उभे राहीलात व एवढे उद्योग व्यवसाय उभे करुन सहकारात क्रांती घडविली व प्रत्येकाच्या हाताला काम दिले.दवाखान्यातून बरे होऊन मी घरी आले तेव्हा माईंनी औक्षण केले.सायंकाळची आपली जेवणाची वेळ झाली परंतू आपण माझी वाट पहात होते जेवायचे थांबलात मी आल्यावर आपल्याला आनंद झाला,मी तुझीच वाट पहात होतो असे आपण म्हणताच माझ्या आजारपण बरे होण्यापेक्षाही तुमच्या शब्दांची उर्जा मला जास्त मिळाली.रोज डॉ.प्राचीला माझी तब्बेत विचारण्यासाठीही आपण फोन केला यावरुन तुमची माझ्याविषयीची अपार काळजी मनाला हळवे करुन गेली.

    जनतेच्या संकटात धाऊन जाण्याचा आदर्श,शिकवण आपणच आम्हांसमोर ठेवली.आपला परिवार हा फक्त आम्ही कुटुंबीय नसून हा सर्व समाज आपले कुटुंब आहे.आपण लोकनेते होतात आपण जोडलेली ही सर्व कार्यकर्ते,सर्वसामान्य जनता , शेतकरी,कष्टकरी,गोरगरीब हा सर्व परिवार सांभाळण्याची परमेश्वर मला शक्ती देवो,आपला आशिर्वाद सतत पाठीशी रहावो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. साहेब, आपल्या आत्म्यास चिरशांती मिळो, हीच परमेश्वराकडे प्रार्थना 

Post a Comment

0 Comments