असे " साहेब " होणे नाही. --- माधवराव पाटील.
कोपरगाव प्रतिनिधी :---- कै. शंकररावजी कोल्हे साहेबांचा राख सावडायचा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच , त्यांच्या आस्थी या साहेबांनी सर्व प्रथम बांधलेल्या गोदावरी नदीवरील हिगंणी बंधाऱ्यात सर्व प्रथम विसर्जन करण्यात आल्या, या हस्थी विसर्जनासाठी मला स्वतः सर्वांचे आवडते खूप साधे सरळ व्यक्तीमत्व असणारे बिपीन दादांनी बोलावून घेतले व त्यांच्या कुटुंबाबरोबर माझ्या ही हस्ते माझ्या साहेबांच्या हस्थि विसर्जन मला करता आल्या , या बद्धल दादांच्या ऋणात राहू इच्छितो
असे भावनात्मक उद्गार माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांचे वडील व कै. शंकररावजी कोल्हे साहेब यांचे जुने विश्वासू सहकारी संजीवनी कारखान्याचे माजी अभियंता माधवराव पाटील यांनी व्यक्त केले. तसेच
हस्थी विसर्जनानंतर साहेबांच्या बद्धल दोन शब्द बोलायची संधी ही दिली.
या वेळी संजीवनी कारखान्याचे माजी चिफ सिव्हिल इंजिनिअर माधवराव पाटील ज्यांना साहेब यांचे बरोबर काम करता आले , ते म्हणाले की
माजी मंत्री आदरणीय कै. शंकररावजी कोल्हे साहेब यांनी सर्व प्रथम गोदावरी नदीवर पहिला के.टी.वेअर, कोपरगाव तालुक्यात "हिंगणी" येथे १९८८ साली बांधण्याचे धाडस करून तो पूर्ण केला. साहेबांनी भविष्यात कोपरगाव तालुक्यातील शेतीच्या पाण्याची टंचाई ओळखून व वाढती मागणी ओळखून पाणी आडवल्याशिवाय पाणी वाढणार नाही म्हणून बंधारे बांधण्याची सुरवात केली. कोपरगाव शहरातील व्यापार वाढवा , उद्योग वाढावे यासाठी त्यांनी शेतीचे पाणी वाढण्यासाठी महाराष्ट्र।त गोदावरी नदीवर के.टी वेअर बांधणारे पाहिले व्यक्ती ठरले . या नंतर साहेबांनी एकुन 3 मोठे के.टी. वेअर बांधले. त्यानंतर गोदावरी नदीवर शेवट पर्यंत खूप बंधारे बांधले गेले. छोट्या ओढ्या नाल्यावर ४४ सिमेंट चे दगडी बंधारे बांधले , २७ कच्चे मातीचे बंधारे , ९० शेत तळे असे अनेक व पाणी अडवण्यासाठी कामे केली. त्याच बरोबर मला पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंग कॉलेज साठी जागा घेण्याची व त्या नंतर बांधण्याची जबाबदारी माझ्या वर दिली. तीही जागा घेऊन तिथे मोठे कॉलेज आज तालुक्य।तील जनतेसाठी केले. गोदावरी दूध संघाचे सुरवातीचे काम , माझ्या देखरेखीखाली साहेबांच्या आदेशाने केले. कारखान्यात उभारलेले बायोप्रॉडक्ट चे कामे , कारखान्या साठीचे तळे , खर्डी गणेश सँपकॉम चे फूड प्रोसेसिंग युनिट , येसगाव येथील यशवंत पोल्ट्रीचे स्थापनेपासून चे काम , साईबाबा कॉर्नर ते संजीवनी ते रेल्वे स्टेशन हा जुना रस्ता , तालुक्यातील अनेक रस्ते , ईमारती , मंदिरे . तसेच संत जनार्दन स्वामी महाराज यांचे समाधी मंदिर , शिव मंदिर , महर्षी शाळा ही सर्वे वरील कामे आदरणीय कै. कोल्हे साहेब याचे मुळेच मला मिळाले. साहेबाच्या मार्गदर्शना खाली जे साहेबाना कोपरगाव तालुक्या साठी कामे करायची होती ती कामे करता आली . साहेब स्वतः बांधकामे दर्जेदार व्हावेत यासाठी स्वतः जातीने लक्ष देत.
जनतेसाठी कोल्हेसाहेब हे " नेते " होते व आमच्या साठी " साहेब " या २४ मार्च ला साहेब हे ९३ वर्षांचे पूर्ण झाले असते. त्याचा वाढदिवास बघायचा होता. मी ही आत्ता ८३ वर्षांचा झालो आहे. कधी जर साहेबाचा फोन आला तर या वयातही मी जागेवरून उठून बोलत असे. साहेबांचा आदरयुक्त दरारा ,प्रेम व धाक आम्ही कधी विसरू शकणार नाही. अशा या महान नेत्याला साहेबांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करून असे महान व्यक्ती परत होणे नाही अशा भावना माधवराव पाटील यांनी साहेबांविषयी व्यक्त केल्या.
0 Comments