माहेगाव देशमुख, मुर्शतपुरच्या रस्त्यांसाठी ना. आशुतोष काळेंकडून ६४ लाखांचा निधी
कोपरगांव प्रतिनिधी:----- कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील पानगव्हाणे वस्ती (हनुमान मंदिर) ते संजय दाभाडे घर रस्ता तसेच मुर्शतपुर येथील मुर्शतपुर फाटा ते इजिमा १६० मांढरे वस्ती प्रजिमा ९९ पर्यंत रस्ता डांबरीकरण करणेसाठी व प्रजिमा ८ (म्हसोबा नगर) ते अण्णासाहेब शिंदे घर रस्ता मजबुतीकरण करणेसाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी ६४ लाख रुपये निधी दिला आहे. मागील अनेक वर्षापासून या रस्त्यासाठी निधीची ग्रामस्थांची मागणी यानिमित्ताने ना. आशुतोष काळेंमुळे पूर्ण झाली असून त्यांच्या हस्ते नुकतेच या रस्त्याचे भूमिपूजन संपन्न झाले आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी ना. आशुतोष काळे यांनी केलेल्या प्रयत्नातून मतदार संघातील अनेक दुर्लक्षित असलेल्या रस्त्यांना निधी मिळाला असून मत्तदार संघात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. विकासाचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी रस्त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्यादृष्टीने मतदार संघाच्या रस्ते विकासाला ना. आशुतोष काळे यांनी प्राधान्य दिल्यामुळे अनेक रस्त्यांचे भाग्य उजळले आहे व नागरिकांचा प्रवास सुखकर झाला आहे. अशाच रस्त्यांपैकी मागील पाच वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या मुर्शतपूर येथील रस्त्याला ना. आशुतोष काळे यांनी निधी दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी ना. आशुतोष काळे यांचे आभार मानले असून या रस्त्याचे नुकतेच भूमिपूजन करण्यात आले आहे.
यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधने, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, संचालक हरिभाऊ शिंदे, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, संचालक सचिन आव्हाड, सुंदरराव काळे, भास्करराव काळे, संजय काळे, रविंद्र काळे, मधुकर काळे, शिवाजीराव काळे, बापूसाहेब जाधव, विकास रणशिंग, हेमंत देशमुख, राधाकीसन काळे, यादवराव पानगव्हाणे, के.पी. रोकडे, शरद पानगव्हाणे, बाबासाहेब पानगव्हाणे,माधवराव पानगव्हाणे, इंद्रभान पानगव्हाणे, अरुण पानगव्हाणे, रावसाहेब पानगव्हाणे, विलास काळे, अशोक पानगव्हाणे, प्रकाश काळे, विष्णू शिंदे, नितीन शिंदे, डॉ. अनिल दवंगे, रामदास केकाण, भाऊसाहेब शिंदे, काकासाहेब शिंदे, भाऊसाहेब भाबड, शांतीलाल शिंदे, सखाराम पानगव्हाणे, योगेश काळे, रामदास पानगव्हाणे, नंदकिशोर चव्हाण, भरत दाभाडे, पांडुरंग कदम, सुरेश काळे, शिवाजी पानगव्हाणे, भिकन सय्यद, भरत पानगव्हाणे, मच्छिन्द्र जाधव, ज्ञानेश्वर काळे, संजय दाभाडे, गणेश पानगव्हाणे, संदीप पानगव्हाणे, शैलेश पानगव्हाणे, शरद दाभाडे, राहुल जगधने, पंढरीनाथ थोरात, जालिंदर शिंदे, हारून शेख, अल्ताफ शेख, संदीप बारवकर, अजित जावळे, सुभाष दवंगे, नवनाथ दवंगे, शिवाजी दवंगे, सुनील गिरमे, प्रमोद शिंदे, अण्णासाहेब शिंदे, रोहिदास मोरे, प्रवीण गुंजाळ, सूर्यभान दवंगे, शिवाजी वढणे, उमेश दीक्षित, गोरख वैद्य, रविंद्र थोरात, दत्तात्रय आरोटे, किसनराव दवंगे, दगु भुजाडे, किरण दहे, तुषार केकाण, कृष्णा माळी, धनराज पवार, सागर पवार, अमोल बाचकर, किरण बाचकर, डॉ. सचिन होन, बापु काळे, रमेश पानगव्हाणे, संजय गायकवाड, मच्छिन्द्र गावित्रे, स्वप्नील काळे, प्रमोद काळे, शिवाजी लांडगे, दादासाहेब भगुरे, रावसाहेब काळे, सुनील पानगव्हाणे, बाळासाहेब पानगव्हाणे, संजय खैरनार, गणपत रोकडे, सुदाम जाधव, अविनाश काळे, मयूर काळे, हेमंत पानगव्हाणे आदींसह ग्रामस्थ माहेगाव देशमुख व मुर्शतपूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments