Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

राष्ट्रीय कुटुंब कल्याण अर्थ सहाय्य योजनेंतर्गत ना. आशुतोष काळेंच्या हस्ते महिलांना १.४० लाखाचे वाटप

 राष्ट्रीय कुटुंब कल्याण अर्थ सहाय्य योजनेंतर्गत

ना. आशुतोष काळेंच्या हस्ते महिलांना १.४० लाखाचे वाटपकोपरगाव प्रतिनिधी:---- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील राहाता तालुक्यातील पुणतांबा, वाकडी, चितळी,जळगाव आदी गावातील सात महिलांना राष्ट्रीय कुटुंब कल्याण अर्थ सहाय्य योजनेंतर्गत प्रत्येकी २० हजार रुपये याप्रमाणे एकूण १.४० लाखाच्या धनादेशाचे वाटप नुकतेच श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहे.

 सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील कमवत्या व्यक्तीचे (पुरुष किंवा महिला) अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास एक रक्कमी रु.२०,०००/- चे अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेस पात्र असलेल्या कोपरगाव विधानसभा मतदार संघातील राहाता तालुक्यातील पुणतांबा, वाकडी, चितळी,जळगाव या गावातील महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ना. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाकडे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून पाठपुरावा केला होता. केलेल्या पाठपुराव्यातून या सर्व महिलांना प्रत्येकी रुपये २०,०००/- मदत मंजूर झाली. त्या रक्कमेचा धनादेश नुकताच श्रीमती मीना रावसाहेब माळी, श्रीमती अर्चना विजय साळुंके, श्रीमती वंदना राजेंद्र साबळे, श्रीमती कांता सुरेश साळुंके, श्रीमती जयश्री विश्वर साळुंके, श्रीमती अनुराधा रामनाथ बोऱ्हाडे, श्रीमती मंगल भाऊसाहेब धरम या महिलांना ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते देण्यात आला. ज्या कुटुंबातील कमावत्या व्यक्तिंचे निधन झाले आहे ते कुटुंब मदतीस पात्र आहे अशा कुटुंबांनी राहाता जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क करून कागदपत्रांची पूर्तता करावी त्या कुटुंबांना देखील लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही ना. आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकुमार सदाफळ, जिल्हा परिषद सदस्या श्रीमती संध्या थोरात, अनिल कोते, आण्णासाहेब कोते, दत्तात्रय लांडे, गुलशेर शेख आदी मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

0 Comments