आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

तक्रार दिल्याच्या कारणावरून एकास लाकडी दांड्याने मारहाण, परिसरात दहशतीचे वातावरण. आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

 तक्रार दिल्याच्या कारणावरून एकास लाकडी दांड्याने मारहाण, परिसरात दहशतीचे वातावरण. 

आठ जणांविरोधात गुन्हा दाखलकोपरगाव प्रतिनिधी:--- कोपरगाव शहरातील गांधीनगर परिसरात तील इंडोर गेम परिसरामध्ये मंगळवार 15 फेब्रुवारी रोजी रात्री साडेसातच्या सुमारास आमच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार देतो म्हणून सुनील काळूराम कुंडारे याला सात ते आठ जणांनी लाकडी दांड्याने मारहाण केली या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे याबाबत कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत थोडक्यात माहिती अशी की शहरातील संवेदनशील म्हणून समजल्या जाणाऱ्या गांधिनगर परिसरात राहणारे सुनील काळूराम कुंडारे याला त्याच भागात राहणाऱ्या १)अजय पाटील रा झेंडे गल्ली२) महेश गायकवाड रा झेंडे गल्ली ३)सनि गायकवाड रा झेंडे गल्ली ४) योगेश गायकवाड रा झेंडे गल्ली५) स्वप्निल गायकवाड झेंडे गल्ली ६) राहुल चवंडके महादेव नगर  ७) आमित वसंत बागंर  गांधीनगर ८) चेतन जगदीश रत्नाळु  इंदिरा नगर कोपरगाव यांनी मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास इंडोरगेम हाॅल परिसरामध्ये लाकडी दांड्याने मारहाण केली व  त्याच्या गॅरेजच्या सामानाची तोडफोड करुन मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली होती. मात्र घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक वासुदेव देसले हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले  त्यामुळे पुढील अनर्थ टळला याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाणे मध्ये सुनील काळूराम कुंभारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर ४३/ २०२२भां द.वि.कलम ३२४,३२३१४३ १४७,१४८,१४९ ४२७प्रमाणे वरील ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अचानक झालेल्या या भांडणामुळे परिसरामध्ये सध्या दहशतीचे वातावरण पसरले  आहे गेल्या काही दिवसांपासून या भागांमध्ये राजकीय हेवेदावे व  गटातटांमुळे परिसरामध्ये भांडण मारामारी हे नित्याचे होऊन बसले आहे त्यामुळे परिसरात राहणाऱ्या सह व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

Post a Comment

0 Comments