आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

जेऊर पाटोद्याचा देखील पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावू – ना. आशुतोष काळे


 जेऊर पाटोद्याचा देखील पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावू – ना. आशुतोष काळे



कोपरगाव प्रतिनिधी:---- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील मागील अनेक वर्षापासून अनेक गावातील रखडलेल्या पाणी पुरवठा योजना मार्गी लावण्यात व कोपरगाव शहराचा  ५ नंबर साठवण तलाव व विस्तारित पाणी योजना मार्गी लावण्यात महाविकास आघाडी सरकारच्या मदतीने यश आले आहे. त्याप्रमाणे जेऊर पाटोद्याचा देखील पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी जेऊर पाटोद्याच्या ग्रामस्थांना दिली.

ना. आशुतोष काळे यांनी नुकतीच शिवजयंती कार्यक्रमानिमित्त जेऊर पाटोद्याला भेट दिली त्यावेळी जेऊर पाटोद्याच्या राष्ट्रवादीचे ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक महिलांनी व ग्रामस्थांनी त्यांच्याकडे रखडलेली पाणीपुरवठा योजना व त्यामुळे येत असलेल्या अडचणी त्यांच्यापुढे मांडल्या. ज्याप्रमाणे मतदार संघातील अनेक गावांचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावला त्याप्रमाणे जेऊर पाटोद्याचा देखील पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावून महिला भगिनींची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवावी असे साकडे घातले. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांना आश्वासित करून येणाऱ्या काळात जेऊर पाटोद्याचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करू. धारणगाव पाणी पुरवठा योजनेमध्ये जेऊर पाटोद्याचा देखील समावेश होता. त्यावेळी धारणगाव पाणी पुरवठा योजना रखडल्यामुळे जेऊर पाटोद्याबरोबरच धारणगाव, हिंगणी, चांदगव्हान, मुर्शतपूर या गावातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. मात्र यापुढे या सर्व गावांचे नवीन सुधारित प्रस्ताव तयार करून असलेल्या त्रुटी दूर करून सर्व अहवाल शासनदरबारी दाखल करणार असून जेऊर पाटोद्यासाठी स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजना मंजूर करून जेऊर पाटोद्याचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी काम हाती घेतले आहे. त्याचा पाठपुरावा करून इतर गावांप्रमाणे जेऊर पाटोद्याचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न देखील मार्गी लावणार असल्याचे ना.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी माजी सरपंच भाऊसाहेब भाबड, माजी नगरसेवक संतोष चवंडके, माजी शिवसेना शहरप्रमुख सनी वाघ, ग्रामपंचायत सदस्या सौ. भारती भाबड, अशोकराव निकम, अशोकराव बोऱ्हाडे, अनिल लकारे,सचिन शेवाळे, नितीन  शिंदे, नानासाहेब बाविस्कर, साईदीप पवार, संतोष माळी, सौ.आशाताई भिंगले, सौ. सोनाली बोऱ्हाडे, सौ. वैशाली शिंदे, सौ. पूजा बाविस्कर, पाटीलसाहेब हिरगळ, बबनराव जाधव, देविदास सपकळ, सौ. सुधा निकम, सौ. शोभा लकारे, संदीप जाधव, गणेश शेवाळे, बाळासाहेब मोरे,जगमोहन राजपाल, प्रीतेश माने, सौ. अर्चना लाड, राजेंद्र होन आदींसह जेऊर पाटोद्याचे ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments