पाझर तलाव व साठवण बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी१ कोटी ४२ लाख निधी मंजूर- ना.आशुतोष काळे.
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:----- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक गावातील पाझर तलाव व साठवण बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी मृद व जलसंधारण विभागाने १ कोटी ४२ लाख रुपये निधी मंजूर केला असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
अवर्षणग्रस्त असलेल्या कोपरगाव तालुक्यात पाणी टंचाई जाणवू नये यासाठी अनेक गावात पाझर तलाव व साठवण बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र मागील काही वर्षापासून या बंधाऱ्यांची नियमितपणे दुरुस्ती न झाल्यामुळे या पाझर तलाव व साठवण बंधाऱ्यांची दुरावस्था होऊन पाणी साठवण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्याबाबत संबंधित गावातील नागरिकांनी या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा अशी मागणी ना.आशुतोष काळे यांच्याकडे केली होती. त्या मागणीची दखल घेऊन मृद व जलसंधारण विभागाकडे केलेल्या पाठपुराव्यातून एकूण १६ साठवण बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ४२ लाख निधी मिळविण्यात यश मिळाले असल्याचे ना.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
यामध्ये पोहेगाव येथील बाजारतळ, भुजबळ वस्ती खडकी नाला, मेळतोंड व पाटील मळा, चांदेकसारे परसराम होन वस्ती, बक्तरपूर, वारी येथील टेके वस्ती, अंचलगाव, ओगदी, बोलकी, धामोरी देवनदी, काकडी, गुंजाळ वस्ती व शिंदे वस्ती, मंजूर, रामभाऊ मोरे वस्ती, देर्डे कोऱ्हाळे या साठवण बंधाऱ्यांचा समावेश आहे. या पुढील काळात देखील उर्वरित बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ना.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे. बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधी दिल्याबद्दल ना.आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ, मृद व जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख, मृद व जलसंधारण राज्य मंत्री ना. दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषद अध्यक्षा ना. सौ. राजश्रीताई घुले यांचे आभार मानले आहे
0 Comments