आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

संजीवनी अकॅडमी मध्ये रीड ए थाॅन स्पर्धा संपन्न - डाॅ. मनाली कोल्हे. बालकांच्या संभाषण कौशल्य वाढीसाठी अभिनव उपक्रम

 संजीवनी अकॅडमी मध्ये रीड ए थाॅन स्पर्धा संपन्न - डाॅ. मनाली कोल्हे. 

बालकांच्या संभाषण  कौशल्य वाढीसाठी अभिनव उपक्रम
कोपरगांव प्रतिनिधी:---- संजीवनी अकॅडमी मध्ये दरवर्षी प्रमाणे या वर्षीही  रीड ए थाॅन स्पर्धा संपन्न होवुन विजेत्यांना पारितोषिके  देण्यात आली.विध्यार्थ्यांमध्ये  वाचनाची आवड निर्माण व्हावी व त्यांनी  मोबाईलचा वापर कमी करावा, हा त्यामागील हेतु आहे. या स्पर्धेत विध्यार्थ्यांनी  कोणतेही एक गोष्टीचे  पुस्तक वाचुन ती गोष्ट  स्वतःच्या शब्दात सांगायची होती. त्यासाठी विध्यार्थ्यांना  विविध चित्रे किंवा गोष्टीशी  संबंधित इतर साहित्य देखिल वापरायची होती. ही स्पर्धा कोपरगांव व परीसरातील सर्व शाळांमधिल विध्यार्थ्यांसाठी खुली होती. तीन दिवस घेण्यात आलेल्या स्पर्धेत सुमारे २५० विध्यार्थ्यांनी  मराठी, हिंदी व इंग्रजी मधुन ऑनलाईन  पध्दतीने गोष्टी सांगुन आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन  घडविले, अशी माहिती संजीवनी अकॅडमीच्या संचालिका डाॅ. सौ. मनाली अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

डाॅ. कोल्हे यांनी पत्रकात पुढे सांगीतले आहे की ऑनलाईन  घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये विध्यार्थ्यांमधील भाषेवरील  प्रभुत्व, त्यांचा शब्द संचय, सभाधीटपणा व वत्कृत्व कला वाढीस लागल्याचे पालकांच्या प्रतिक्रीया मिळाल्या.

या स्पर्धेतील यशस्वी विध्यार्थ्यांसाठी ऑनलाईन  पध्दतीने पारीतोषिक  समारंभ आयोजीत करण्यात आला होता. सदर प्रसंगी श्री संज जनार्दन स्वामी महर्षि  विद्यामंदिर शाळेचे प्राचार्य श्री राजेंद्र पानसरे, भागचंद माणिकचंद ठोळे शाळेचे प्राचार्य श्री मकरंद निमोणकर व संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या आय. टी. विभागाच्या प्रमुख डाॅ. माधुरी जावळे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते.

स्पर्धेसाठी तीन गट करण्यात आले होते.   प्रिप्रायमरीच्या पहिल्या गटात शर्वरी देवकर, मनस्वी मोढे, निलय गुजराथी, रिदीमा अव्हाड व शिवांश  खराटे यांनी अनुक्रमे १  ते ५ क्रमांक पटकाविले. याच गटात मोक्ष कासलीवाल, शौर्या  देवढे, इनायत पठाण, युगविर रणदिवे, झोया शेख  व  कंगणा वर्मा यांनी  उत्तेजनार्थ बक्षिसे मिळविली. इ. १ ली ते ३ रीच्या दुसऱ्या या गटात श्लोक  दवंगे, अर्णव मोढे, संहिता नरोडे, श्रीजा झरेकर स्वरा गायकवाड यांनी अनुक्रमे १ ते ५ क्रमांक मिळविले. याच गटात शिवांश  कोल्हे, मनवा गवारे, ओवी आघाव, आरोही शिंदे , अनुराग कोकाटे व आदिश  काब्रा यांनी उत्तेजनार्थ बक्षिसे मिळविली. इ.४ थी ते ७ वीच्या तिसऱ्या  गटात आदिती जोरी, दिग्वीजय शिंदे , संविधा जोशी यांनी  १ ते ४ क्रमांक मिळविले तर अभिज्ञा रंधिर व श्रृती चांदर यांना विभागुन ५ वा क्रमांक देण्यात आला. याच गटात कृपा झालटे, साई सिनगर, भाविका धाडीवाल, स्वरा कोकाटे व कनिका शर्मा  यांनी उत्तेजनार्थ बक्षिसे मिळविली. सर्व विजेत्यांना रोख बक्षिसे, ट्राॅफी, प्रमाणपत्र व पुस्तकाने गौरविण्यात आले.

आवडीचे गोष्टीचे  पुस्तक वाचुन त्यावर समजलेली गोष्ट  रंजकपणे मांडण्याच्या या अभिनय उपक्रमाबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  कार्याध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमिूत कोल्हे यांनी समाधान  व्यक्त करून सर्व विजयी विध्यार्थ्यांचे  अभिनंदन केले

Post a Comment

0 Comments