संजीवनी सैनिकी स्कूलचे कार्य कौतुकास्पद - ग्रुप कॅप्टन उज्वल घोरमाडे
ग्रुप कॅप्टन घोरमाडे यांची संजीवनी सैनिकी स्कूलला सदिच्छा भेट
कोपरगांव प्रतिनिधी:----- संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर काॅलेज ही संस्था कोपरगांव सारख्या ग्रामिण भागात असुनही दर्जेदार शिक्षणाबरोबरच देश सेवेचे मुल्ये तरूणांमध्ये बिंबविण्याचे उत्तम कार्य येथे होत आहे. या स्कूलचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री श्री शंकरराव कोल्हे यांची तरूणांना सैनिकी प्रशिक्षण देण्याची दूरदृष्टीता वाखाणन्याजोगी आहे. येथिल शिस्त आणि आधुनिक ज्ञानाचे धडे घेणारे कॅडेटस् कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होतील, असे गौरवोद्गार सैनिक स्कूल, साताराचे प्राचार्य व इंडियन एअर फोर्सचे ग्रुप कॅप्टन श्री उज्वल घोरमाडे यांनी काढले.
ग्रुप कॅप्टन घोरमाडे यांनी नुकतीच संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर काॅलेजला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांना इ. १० वी, ११ वी व १२ वीच्या कॅडेटसने उत्कृष्ट संचलन करून गार्ड ऑफ ऑनर दिला. या प्रसंगी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त श्री सुमित कोल्हे, प्राचार्य डाॅ. जी.बी. गायकवाड, उपप्राचार्य के. एल. दरेकर व शिक्षक वृंद उपस्थित होते.
ग्रुप कॅप्टन घोरमाडे पुढे म्हणाले की सातारा येथिल सैनिक स्कूल १९६१ साली सुरू झाली असुन शैक्षणिक , मानसिक, शारीरिक दृष्ट्या सक्षम पिढी तयार करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या अशा ३३ शाळांमधिल पहिली सैनिक शाळा आहे. सातारा येथिल शाळेप्रमाणेच संजीवनी सैनिकी स्कूल मध्ये पॅटर्न राबविला जातो ही बाब कौतुकास्पद आहे. यामुळे येथे शिकत असलेल्या कॅडेट्समध्ये सुध्दा आत्मविश्वास , आत्मनिर्भरता, सामावुन घेणारा स्वभाव, उच्च आदर आणि इतरांच्या विचारांचा आदर, धर्मनिरपेक्ष दृष्टीकोन , अशा पैलुंची रूजवण होत आहे. निरोगी शरीरात सुदृढ मन असल्यामुहे ते जीवनीच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होतील.
ग्रुप कॅप्टन घोरमाडे यांनी संजीवनी सैनिकी स्कूल मधिल वसतिगृह व तेथिल सुविधा, अटल टिंकरींग लॅब, खेळाची विस्तृत मैदाने, जलतरण तलाव, भव्य जिम्नॅशिअम हाॅल, इत्याइी बाबींचीही वाहवा केली व भविष्यात आवश्यक ती मदत करण्याची भावना व्यक्त केली
0 Comments