कोपरगावमध्ये राष्ट्रीय एकात्मता व जातीय सलोखा दिवस' साजरा.
कोपरगाव प्रतिनिधी:----- कोपरगाव शहरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवार (दि.३०) रोजी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय एकात्मता व जातीय सलोखा दिवस' साजरा करण्यात आला.
यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून सांप्रदायिक सद्भावनेची शपथ घेतली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, नगरसेवक मंदार पहाडे, हाजी मेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, फकीर कुरेशी, जावेद शेख, चंद्रशेखर म्हस्के, कार्तिक सरदार, वाल्मिक लहिरे, धनंजय कहार, सचिन आव्हाड, नारायण लांडगे, आकाश डागा, इम्तियाज अत्तार, विकास बेंद्रे, अंबादास वडांगळे, सागर लकारे, रविंद्र राऊत, पुंडलिक वायखिंडे, एकनाथ गंगूले, संतोष बारसे, मनोज कडु, दिनेश पवार, राहुल राठोड, योगेश नरोडे, किशोर डोखे, गणेश बोऱ्हाडे, शंकर घोडेराव, प्रताप गोसावी, दिनेश संत, शफीक शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments