आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

विकासाच्या प्रश्नावरून लक्ष हटविण्यासाठी केंद्र सरकारचे दडपशाहीचे राजकारण :- ना. आशुतोष काळे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचा कोपरगावात महाविकास आघाडीकडून निषेध

 विकासाच्या प्रश्नावरून लक्ष हटविण्यासाठी केंद्र सरकारचे दडपशाहीचे राजकारण :- ना. आशुतोष काळे

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचा कोपरगावात महाविकास आघाडीकडून निषेध    कोपरगाव प्रतिनिधी:---- विकासाच्या बाबतीत केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. नोटबंदी व जीएसटी कर प्रणालीमुळे अनेक उद्योगधंदे बुडाले असून अनेकांच्या हातचे रोजगार कायमचे हिरावले आहे.बेरोजगारांच्या हाताला काम नाही. लॉक डाऊनमुळे शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, छोटे-मोठ्या व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिक अडचणीत असून महागाई गगनाला भिडली आहे. याकडे केंद्र सरकारने लक्ष देवून सर्वसामान्य जनतेला दिलासा देणे गरजेचे आहे. मात्र या प्रश्नावरून लक्ष हटविण्यासाठी केंद्र सरकार दडपशाहीचे राजकारण करीत असून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने केलेली अटक केंद्र सरकारची दडपशाही असल्याची टीका श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे केली आहे.  

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक हे सातत्याने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणावर लोकशाही पद्धतीने जाहीरपणे बोलत असल्यामुळे केंद्र सरकारने राजकीय सुडापोटी) केंद्रीय तपास यंत्रणा ईडी(अंमलबजावणी संचालनालय) चा वापर करून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. त्या अटकेच्या निषेधार्थ शुक्रवार (दि.२५) रोजी  कोपरगाव शहर व तालुका महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मारक येथे ना. आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार व केंद्रीय तपास यंत्रणांचा निषेध करण्यात आला.याप्रसंगी ना.आशुतोष काळे बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, केंद्र सरकार विकासाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करून दडपशाही करीत आहे. केंद्र सरकारला धडा शिकविण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवावे लागणार असल्याचे ना.आशुतोष काळे यांनी सांगितले. यावेळी नायब तहसीलदार श्रीमती मनिषा कुलकर्णी यांना कोपरगाव शहर व तालुका महाविकास आघाडीच्या वतीने ना.आशुतोष काळे यांनी निवेदन दिले.

 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, शिवसेना शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडियाल, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, राष्ट्रीय युवकचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे, महिला शहराध्यक्षा सौ. प्रतिभा शिलेदार, युवती तालुकाध्यक्षा सौ. वैशाली आभाळे, महिला जिल्हा सरचिटणीस सौ. रेखा जगताप, विद्यार्थी तालुकाध्यक्ष निखिल डांगे, विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार, मनसेचे सुनील फंड, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक विठ्ठलराव आसने, आनंद चव्हाण, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, हाजी मेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, रमेश गवळी, फकीर कुरेशी, सौ. मायादेवी खरे, चंद्रशेखर म्हस्के, राहुल देवळालीकर, सुनील मोकळ, रावसाहेब साठे, जावेद शेख, प्रफुल्ल शिंगाडे, केशव जावळे, कौसर सय्यद, भाऊसाहेब भाबड, बाळासाहेब रुईकर, अंबादास वडांगळे, राजेंद्र खैरनार, अशोक आव्हाटे, वाल्मिक लहिरे, संदीप कपिले, धनंजय कहार, नितीन शिंदे, इम्तियाज अत्तार, आकाश डागा, महेश लोंढे, दिपक रोहोम, संकेत कडवे, प्रसाद उदावंत, विकी जोशी, राजेंद्र आभाळे, मनोज कडू, मनोज नरोडे, विकास बेंद्रे, किशोर डोखे, स्वप्नील सोनवणे, सागर लकारे, एकनाथ गंगूले, राजेंद्र जोशी, तेजस साबळे, महेश उदावंत, संतोष शेलार, भाग्यश्री बोरुडे, शितल लोंढे, कविता जिरे, सौ. रुपाली कळसकर, मिरा साळवे, सुषमा पांडे, शितल वायखिंडे, दिनेश संत, शंकर घोडेराव, फयाज शेख, राकेश शहा, राजेंद्र पठाण, गणेश बोरुडे, मनोज शिंदे, यासीर अत्तार, अक्षय दहे, मन्सालाल दहे, बाबासाहेब होन, नारायण लांडगे, चंद्रहार जगताप, इरफान शेख, राहुल देशपांडे, वैभव गिते, सुनील कुंढारे, सागर सोमवंशी, बाबुराव पवार, लक्ष्मण फुलकर, विजय जाधव, योगेश जावळे, स्वप्नील शिंदे, शुभम शिंदे,प्रसाद रुईकर, जब्बार मन्सूरी, रविंद्र राऊत, ज्ञानेश्वर भगत, किरण बागुल, ऋतुराज काळे, रितेश राऊत, संतोष बारसे, तुकाराम चव्हाण, राजेंद्र ठाकरे, रोशन शेजवळ, अक्रम शेख, चंद्रकांत धोत्रे, शफीक शेख, योगेश वाणी, रोहित खडांगळे, राहुल राठोड, सोमेश शिंदे, प्रतीक रुईकर, प्रदीप मते, अर्जुन डूबे, अमोल गिरमे, प्रदीप कुऱ्हाडे, रवींद्र देवरे, अभिषेक कोकाटे, जनार्दन शिंदे, लवेश शेलार, विजय शिंदे आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments