आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

संजीवनी अकॅडमीत वार्षिक क्रीडा स्पर्धा संपन्न दोन वर्षानंतर बालगोपालांनी लुटला खेळाचा मनमुराद आनंद

 संजीवनी अकॅडमीत वार्षिक  क्रीडा स्पर्धा संपन्न

दोन वर्षानंतर  बालगोपालांनी लुटला खेळाचा मनमुराद आनंद





कोपरगांव प्रतिनिधी :---- कोरोना महामारीने मागील दोन वर्षांपासून  संपुर्ण जग मेटाकुटीस आले. यात शैक्षणिक  जगताला फार मोठा धक्का पोहचला. मात्र संजीवनी अकॅडमीने याही काळात आपल्या विध्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे  ऑनलाईन  पध्दतीने शैक्षणिक  अभ्यासक्रमाबरोबरच इतरही बाबींचे ज्ञान देवुन त्यांचे शैक्षणिक  व इतरही शारीरिक, माणसिक व बौध्दिक मुल्ये जपन्याचा प्रयत्न केला. परंतु सर्वच मुलं-मुली मैदानी खेळापासुन वंचित होती. आता शाळा  सुरू होताच संजीवनी अकॅडमीच्या संचालिका डाॅ. मनाली अमित कोल्हे यांच्या सकल्पनेतुन पुर्व प्राथमिक वर्गांच्या विध्यार्थ्यांसाठी  विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात सुमारे १८० बालगोपालांनी व त्यांच्या पालकांनीही मनमुराद आनंद लुटला, अशी  माहिती स्कूलच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
      प्रारंभी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व स्कूलच्या संचालिका डाॅ. मनाली कोल्हे यांनी क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून स्पर्धांचे उद्घाटन केले. यावेळी डायरेक्टर श्री डी. एन. सांगळे,  प्रिन्सिपाल डायरेक्टर सौ. सुंदरी सुब्रमण्यम, प्राचार्या सौ. शैला  झुंजारराव, विध्यार्थी व पालक उपस्थित होते.
     कोरोना महामारीच्या काळात सर्वांनाच ऑक्सिजनचे महत्व अधिक अधोरेखित झाले. यात महाकाय वसुंधरेतील निसर्गाचे स्थान महत्वाचे आहे. म्हणुन ‘निसर्ग’ ही मध्यवर्ती संकल्पना विचारात घेवुन विध्यार्थ्यांमध्ये  निसर्गाचे महत्व अधिक वृध्दिंगत होण्यासाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यात हनी बी, बटर फ्लाय, कॅटर पिलर, ऑस्ट्रीच , ट्वीटी, अशा  स्पर्धांचा समावेश  होता. पालकांसाठी बिंग बॅलंसिंग व सॅक रेसचा समावेश  होता तर महिला पालकांसाठी रिले रेसचा समावेश  होता. याच प्रसंगी काही विध्यार्थ्यांनी  फुलपाखरांच्या जीवनातील विविध अवस्था तसेच मधमाशा कशा  प्रकारे मध गोळा करतात या विषयावर नाटिका सादर केली.
सदर स्पर्धां दरम्यान पालकांनी आपले मत व्यक्त करताना सांगीतले की दोन वर्षांपासुन  मुलांना शाळेत  येता आले नाही यामुळे मुले उदास झाली होती. परंतु वार्षिक  क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने त्यांच्यात नवचैतन्य बहरले आहे. स्कूलच्या या उपक्रमाबध्दल अनेकांनी धन्यवाद व्यक्त केले. सर्व विजेत्या स्पर्धकांना पदक व प्रमाणपत्र देण्यात आले तर पालकांना झाडाचे रोपटे भेट म्हणुन देण्यात आले.
    क्रीडा प्रशिक्षक  श्री विरूपक्ष रेड्डी, यामिनी मिस्त्रा व अजित सदावर्ते यांनी क्रीडा यशस्वी करण्यासाठी विशेष  परीश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments