आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे दैदिप्यमान व्यक्तिमत्व सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांसाठी अखंड प्रेरणास्रोत -- ना.आशुतोष काळे.

 श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे दैदिप्यमान व्यक्तिमत्व

सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांसाठी अखंड प्रेरणास्रोत -- 

ना.आशुतोष काळे.



कोपरगाव प्रतिनिधी:---- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज ज्या भूमीत जन्माला आले त्या पवित्र भूमीत आपण देखील जन्माला आलो याचा प्रत्येकाने अभिमान बाळगला पाहिजे आणि आपल्या नसनसात आणि डोक्यात नेहमीच शिवविचार असले पाहिजे. महाराजांची ध्येय धोरणे आजही आदर्शवत आहेत. अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेवून हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवरायांनी लोककल्याणकारी व मानवतावादी धोरण कायमस्वरूपी जोपासले. माणूस धर्मासाठी नसून धर्म माणसासाठी आहे याचे प्रत्यक्ष आचरण करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे दैदिप्यमान व्यक्तिमत्व सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांसाठी अखंड प्रेरणास्रोत असल्याचे प्रतिपादन श्री.साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी केले.

  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्यास ना.आशुतोष काळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्री संत जनार्दन स्वामी आश्रमाचे ह.भ.प. परम पुज्य रमेशगिरिजी महाराज व ना.आशुतोष काळे यांच्या हस्ते महाराजांचे विधिवत पूजन व महाआरती करण्यात आली.

  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत सालाबादप्रमाणे याहीवर्षी सेवा फौंडेशन कोपरगाव यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास ना.आशुतोष काळे यांनी भेट देऊन रक्तदान शिबीर आयोजित केल्याबद्दल सेवा फौंडेशनच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. रक्तदात्यांना ना.आशुतोष काळे यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, शिवसेना शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडीयाल, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, शहराध्यक्ष सुनील साळुंके, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, सौ.प्रतिभा शिलेदार, अजीज शेख, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, रेखा जगताप, राष्ट्रवादी युवती तालुकाध्यक्षा सौ.वैशाली आभाळे, मायादेवी खरे, रमेश गवळी, फकीर कुरेशी, दिनकर खरे, प्रफुल्ल शिंगाडे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष निखील डांगे, शहराध्यक्ष कार्तिक सरदार, राहुल देवळालीकर, डॉ.तुषार गलांडे, जावेद शेख, चंद्रशेखर म्हस्के, रावसाहेब साठे, प्रकाश दुशिंग, राजेंद्र वाकचौरे, बाळासाहेब रुईकर, अशोक आव्हाटे, वाल्मिक लहिरे, धनंजय कहार, ऋषिकेश खैरनार, आकाश डागा, सुनील बोरा, शुभम लासुरे, किरण बागुल, भाऊसाहेब भाबड, कुलदीप लवांडे, राजेंद्र आभाळे, अंबादास वडांगळे, हारूण शेख, महेश उदावंत, तेजस साबळे, बिलाल पठाण, सलिम पठाण, मुकुंद इंगळे, नारायण लांडगे, प्रदीप कुऱ्हाडे, रवींद्र राऊत, योगेश वाणी, इम्तियाज अत्तार, अमोल गिरमे, योगेश नरोडे, मनोज कडू, पुंडलिक वायखिंडे, जनार्दन शिंदे, प्रसाद रुईकर, किरण शहा, निलेश पाखरे, विकि जोशी, संदीप देवळालीकर, अमोल आढाव, अक्षय आंग्रे, शिवाजी लकारे, सागर विदुर, नितीन साबळे, गणेश बोरुडे, एकनाथ गंगूले, गणेश लिंभुरे, संतोष शेलार, कुंदन वाघमारे, राहुल आदमाणे, निलेश उदावंत, मनोज राठोड, चांदभाई पठाण, रवींद्र देवरे, संतोष शेजवळ, विशाल साबदे, राहुल देशपांडे, विजय जाधव, चंद्रभान बागुल, ऋषिकेश पगारे, चंद्रहार जगताप, सुरामा पांडे, छाया फरताळे, भाग्यश्री बोरुडे, शितल वायखिंडे, दिक्षा उनवणे, रुपाली कळसकर, शितल लोंढे, सेवा फाउंडेशनचे जुनेद शेख, हाफिज शेख, इरफान तांबोळी, मतीन चोपदार, आसिफ मणियार, फिरोज पठाण, भूमिपुत्र फाउंडेशनचे निसार शेख, अकबर शेख, इम्रान सय्यद, अन्सार शेख, अॅड.नितीन पोळ, जाकीर शेख, आसिफ पठाण, आरिफ पठाण आदींसह नागरिक उपस्थित होते

Post a Comment

0 Comments