आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

पाणी गाळमिश्रित,पट्टी३६५दिवसांची पाणी मात्र ४८ते५०दिवस,वसुली मात्र सक्तीची! हे कितपत योग्य?--- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील.

 पाणी गाळमिश्रित,पट्टी३६५दिवसांची पाणी मात्र ४८ते५०दिवस,वसुली  मात्र सक्तीची! हे कितपत योग्य?--- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील.




कोपरगाव प्रतिनिधी:---- 

पाणी गाळमिश्रित,पट्टी३६५दिवसांची पाणी मात्र ४८ते५०दिवस,वसुली  पट्टी थकली म्हणून नगरपालिकेनी गोरगरिबांचे नळ कनेक्शन तोडणे! हे कितपत योग्य? असा संतप्त  सवाल माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील.यांनी प्रसिद्धी पत्रकातून कोपरगाव नगरपालिकेच्या प्रशासनाला विचारला आहे  याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले की,

कोपरगाव शहरामध्ये सर्वात जास्त( हातावरचे ) मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे व छोटे दुकानदार , टपरीधारक यांची संख्या खूप मोठी आहे.मोलमजुरी करणारा महिला वर्गही मोठा आहे. यातून कसे बसे ते आपले कुटुंब चालवतात.

      सध्या कोपरगाव नगरपालिका आठवड्यातुन म्हणजे ८ (आठ) दिवसातून एकदा पाणी देत आहे .पाण्यासाठी नागरिकांना पाण्याचे कॅन विकत घ्यावे लागतात. महिन्यातुन फक्त ४ दिवस पाणी देतात , वर्षाला ४८ दिवस फक्त .३६५ दिवसाची पट्टी घेतात , अनेक वर्षा पासून नगरपालिका  नियमाने पाणी पट्टी घेऊन , कमी पाणी देते, असे चालू आहे.तरी नागरिक नियमांनी पट्टी भरत आहे.खरे तर आज ही पाणी स्वच्छ येत नाही , अवेळी येते, कधी पाणी येण्याच्या वेळी लाईट जाते, म्हणून पाण्याच्या दिवशी महिलांना खाडा करावा लागतो .

     मागील दोन वर्षांच्या कोरोना च्या काळात गोरगरीब हातावरच्या लोकांना , महिला भगिनींना काम नव्हते , त्यांची खाण्याची सुध्दा अडचणी होत होती, त्यात नगरपालिकेचे येणारे अस्वच्छ पाणी , गाव भर धूळ ,डासांचा त्रास त्यामूळे होणारे आजार यासाठी दवाखान्यात जायला, औषधाला ही खूप पैसे निष्कारण खर्च झाले, उसनवारी करून कर्ज काढून हे निष्कारण नगरपालिके मुळे हे भोगावे लागले.आणि  रोज नियमित स्वच्छ पाणी द्यायचे सोडून  , शहरातील धूळ कमी करायची सोडून , वेळेवर औषध फवारणी व स्वछता करायचे सोडून , रस्ते खाड्यात की खड्डे रस्त्यात हे नीट करायचे सोडून , या सुविधा ने देता , पट्टी थकली म्हणून खुशाल नळ कनेक्शन तोडत आहे , हे कितपद योग्य ,याचा विचार नगरपालिकेने करावा.

   ४२ कोटींची शहराची पाणी योजना ही ४९ कोटीं परियन्त गेली , मग ही पूर्ण करून घ्याची जबाबदारी नगरपालिकेची होती , मग ती का नाही नीट पूर्ण करून घेतली , काम पूर्ण न करता , ट्रायल न घेता , कसे ठेकेदाराला राहिलेली डिपॉझिट रक्कम किंवा देणे दिले.याला जबाबदार कोण?

 तसेच टपऱ्या छोटे दुकाने काढून 10 वर्ष झाले , त्याचे पुनर्वसन आजून केले नाही.अशावेळी नगरपालिका गप्प का ?        

              कोरोना मुळे आत्ता कुठे सर्वे २ महिण्यापासून सुरळीत व्ह्याला लागले , मोलमजुरी करणारे , हातावरचे , छोटे टपरीधारक , छोटे व्यापारी यांची संख्या , गांधीनगर , लक्ष्मी नगर , जबरेश्वर मंदिर परिसर , सुभाष नगर , संजय नगर , खडकी , नदीकाठचा परिसर , टिळक नगर ,इंडोरहॉल परिसर असे बहुसंख्य छोटे लोक , मोलमजुरी करणारे, छोटे व्यापारी लोक नागरिक या भागात राहतात , कोपरगाव शहरातून जवळ जवळ शिर्डी ला कामासाठी , मोलमजुरी करायला ४०% लोक जातात .साईबाबांचे मंदिर मागील २ वर्षी बंद असल्यामुळे ही ,सर्वे शिर्डी गावातील व्यवसाय बंद होते.असजून ही शिर्डीला कामाला जाणाऱ्या लोकांना काम नाही. 

      दोन दिवसांपूर्वी नगरपालिकेने मोठ्या संस्था , शासकीय कार्यालय यांचे कडील थकबाकीची यादी , आकडे प्रसिद्ध केले , मग त्यांच्या बाबतीत  का कठोर वसुली करत नाही ? हा फरक का?

 निदान कोरोनाच्या काळाचा विचार सहानूभूतीपूर्वक करून ,  त्यांना सवलत देऊन नगरपालिकेने सहकार्य करावे. तसेच आधी पालिकेने जनतेकडून घेणारी घरपट्टी व पाणी पट्टी च्या बदल्यात रोज पाणी ,स्वच्छ पाणी , उच्चदर्जाचे रस्ते , आरोग्य सुविधा द्याव्या , आणि मगच गोरगरीब जनतेचे , सर्व सामान्य जनते लोकाचे वसुली हक्कने करावी .  तसेच ज्यांना २४ तास , १२ तास , ६ तास पाणी वर्षा नू वर्ष   , बेकायदेशीर पाणी मिळत होते ,घेत होते , त्याची किती पट्टी घेतात ते ही सांगावे.असेही माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील शेवटी म्हणाले.

Post a Comment

0 Comments