मार्च एन्ड ला बिले काढण्या साठी कामे न करता, शहरातील रस्ते उच्च दर्जाचे झाले पाहिजे-- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील.
कोपरगाव प्रतिनिधी:----
शहरातील इंदिरापथ , के.जे.सोमैया कॉलेज व पंचायत समिती पुढच्या रोड नगरपालिका प्रशासक कधी करणार? तसेच शहरातील सुरू असलेले सर्व रस्त्यांची कामे उच्च दर्जाचे झाले पाहिजे केवळ मार्च इन जवळ आला म्हणून बिले काढण्यासाठी कामे न करता मी व्यवस्थित करावी असे अवाहन माजी.नगराध्यक्ष. मंगेश पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकातून केले आहे. याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले की,
कोपरगाव शहरातील जास्त दळणवळणाचा संभाजी महाराज पुतळा ते गोकुळनगरी ते टाकळी नाका( इंदीरा पथ) या रस्त्याची चाळणी झाली असून त्यामुळे या भागात व इतर ठिकाणी देखील धुळीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यामुळे ह्या रोडचे काम कधी सुरू करणार असा सवाल उपस्थित केला आहे .
त्याच बरोबर पंचायत समिती बिल्डिंग ,ठोळे निवास ते आठरे बंगला ह्या रस्त्याला खूप खड्डे पडले असून, मात्र तहसील कार्यालय पर्यन्त हा रोड केला असून पुढील रस्ता अर्धवट सोडून दिला आहे? .
वाढलेल्या धुळीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे काहींना तर श्वसनाचे व डोळ्याचे विकार होत आहे .या साठी जे डांबरी रोड झाले ,त्याच्या बाजूला लगेच साईड पट्टीला पेविंग ब्लॉक बसवून रोड चे काम लवकर पूर्ण केले पाहिजे, म्हणजे धूळ कमी होऊन जनतेला त्रास होणार नाही. धारणगावं रस्त्याचे काम हे खूप धीम्या गतीने चालू आहे , त्याचा स्पीड वाढवला पाहिजे.
नगरपालिका प्रशासनाने यात लक्ष घालून कामाचे स्पीड वाढवून , उच्च दर्जाचे कामे करून घेऊन जनतेला होणाऱ्या त्रासातून सुटका करावी अशी मागणी देखील माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी शेवटी केली आहे.
0 Comments