आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

मनुष्य जीवनात एकदा तरी नर्मदा परिक्रमा करावी.----परम पूज्य श्री रमेश गिरीमहाराज

 मनुष्य जीवनात एकदा तरी नर्मदा परिक्रमा करावी.----परम पूज्य श्री रमेश गिरीमहाराज




कोपरगाव प्रतिनिधी:----- तालुक्यातील संवत्सर येथील ह भ प श्री वाल्मीक महाराज जाधव यांनी 101 दिवसात नर्मदा नदीची परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल श्री जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती परम पूज्य श्री रमेश गिरी महाराज यांचे हस्ते जाधव यांचा समाधी मंदिरात सत्कार करण्यात आला....यावेळी बाबा म्हणाले की नर्मदा परिक्रमा पूर्ण होण्यासाठी पूर्व जन्माचे पुण्याचे गाठोडे असावे लागते,ज्यावेळेस माणूस परिक्रमा करण्यास तयार होतो .तेंव्हापासून भक्ताच्या योग क्षेमाची काळजी ही भगवंतच पाहत असतो....महाराजांचे पूजन  कुटुंबाचे lसंदीप जाधव यांनी केले. संवत्सर गावात आगमन झाल्यानंतर गावातून टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती तेंव्हा पावन हनुमान मंडळाचे सर्व सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य ,गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश आबा परजने,सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर बापू परजने,कोपरगाव शिवसेना तालुका अध्यक्ष शिवाजी ठाकरे, सरपंच सुलोचना ढेपले,उपसरपंच विवेक परजने,सदस्य महेश परजने, भरत बोरनारे,मुकुंद काळे, लक्ष्मण साबळे, सुदाम साबळे,पत्रकार शिवाजी गायकवाड, प्रेस फोटोग्राफर दत्तात्रय गायकवाड, भरत साबळे,मोहन सोनवणे,प्रकाश गायकवाड,शंकर दैने,दिनेश लोखंडे,लक्ष्मण परजने,सुभाष बिडवे,ज्ञानेश्वर टूपके,प्रताप वरगुडे,बाळू भोसले,जगताप सर आदी उपस्थित होते.....51 महिलांनी डोक्यावर कलश घेऊन फुगड्या खेळत मिरवणुकीत सहभागी होत महाराजांचे औक्षण करून स्वागत केले,जय जनार्दन भजनी मंडळ,जय हनुमान मित्र मंडळ,श्रीराम भजनी मंडळ,शृंगेश्वर भजनी मंडळ रामवाडी भोजडे भजनी मंडळी ग्रामस्थ उपस्थित होते...अनुभव सांगताना जाधव महाराज यांनी सांगितले की तीन महिने कधी पूर्ण झाले हे कळलेच नाही,जेंव्हा घरातून माणूस भगवंत कार्यात पडतो तेव्हा तहान भुकीची काळजी देव पावलो पावली करत असतो असे एक ना अनेक अनुभव सांगताना जाधव महाराज यांना गहिवरून आले, सूत्रसंचालन लक्ष्मण साबळे यांनी केले तर संदीप जाधव यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments