Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

सोमवारी ना. आशुतोष काळेंचा जनता दरबार


सोमवारी ना. आशुतोष काळेंचा जनता दरबार            कोपरगांव प्रतिनिधी:---- सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडी-अडचणी जाणून घेवून अडीअडचणी सोडविण्यासाठी सर्व शासकीय कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांसमवेत श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे सोमवार (दि.२१) रोजी दुपारी ०२:०० वा. कोपरगाव तहसील कार्यालयात जनता दरबार घेणार आहेत. अशी माहिती ना.आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

        मतदार संघातील अनेक नागरिकांचे शासकीय कार्यालयांमध्ये विविध प्रकारची कामे असतात. सर्वसामान्य नागरिक, अपंग व्यक्ती, विधवा महिला, जेष्ठ नागरिक, माजी सैनिक, शेतकरी अशा सर्व स्तरातील सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय कार्यालयात कामानिमित्ताने जावे लागते. शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिक, महिला व जेष्ठ नागरिकांच्या समस्या संबंधित शासकीय अधिकाऱ्यांपुढे मांडून हे प्रश्न तातडीने निकाली निघावे यासाठी ना. आशुतोष काळे यांनी जनता दरबाराचे आयोजन केले आहे. मागील दोन वर्षापासून वैश्विक कोरोना संकटामुळे संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध घालण्यात आले होते. मात्र कोरोनाची तिसरी लाट ओसरत असून बहुतांश निर्बंध हळूहळू शिथिल होत आहेत.त्यामुळे जनता दरबार घेण्याचा निर्णय ना. आशुतोष काळे यांनी घेतला आहे. सर्व नागरिकांचे प्रश्न सुटावे यासाठी नागरिकांनी आपल्या अडचणी व तक्रारी लेखी स्वरूपात मांडाव्या असे आवाहन ना.आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments