आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

दरोडा पडलेल्या कुटंबाची ना. आशुतोष काळेंनी घेतली भेट

 दरोडा पडलेल्या कुटंबाची ना. आशुतोष काळेंनी घेतली भेटकोपरगाव प्रतिनिधी:---- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील राहाता तालुक्यातील जळगाव येथे अशोक वाणी यांच्या वस्तीवर सोमवार (दि.१४) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दरोडा टाकून कुटुंबियांना मारहाण करून दहशत निर्माण केल्यामुळे वाणी कुटुंबीय दहशतीखाली होते. सदर घटनेची माहिती मिळताच श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी नुकतीच त्यांच्या निवासस्थानी जावून वाणी कुटुंबियांची भेट घेतली.

दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत अशोक वाणी व प्रकाश वाणी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे. त्यांच्या देखील प्रकृतीची विचारपूस ना. आशुतोष काळे यांनी यावेळी केली. तसेच जळगाव श्रीरामपूरचे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत असल्यामुळे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून  सदरच्या घटनेचा तातडीने तपास करून गुन्हेगारांना अटक करावी व भविष्यात अशा घटना घडणार नाहीत त्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सूचना दिल्या.

यावेळी सुभाष वाणी, प्रकाश वाणी, शंकरराव चौधरी, सरपंच शिवाजी साबदे, सदस्य दिलीप चौधरी,मच्छिंद्र चौधरी, किरण चौधरी ग्रामसेवक श्रीमती सूर्यवंशी उपस्थित होते.

Post a Comment

1 Comments

  1. Caesars Entertainment buys two tribal casinos - KTNV
    Caesars Entertainment 동해 출장샵 announced Tuesday that it 대구광역 출장샵 has bought two Indian 광주 출장안마 gaming sites owned and operated by 경기도 출장안마 the Eastern Band of Cherokee 군산 출장마사지 Indians in

    ReplyDelete