आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

ना. आशुतोष काळेंच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुक्यातील शासकीय समितीच्या अशासकीय सदस्यांची निवड जाहीर.


ना. आशुतोष काळेंच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुक्यातील शासकीय समितीच्या अशासकीय सदस्यांची निवड जाहीर.



        कोपरगाव प्रतिनिधी:----  महाविकास आघाडी सरकारच्या वतीने कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विविध शासकीय समित्यांच्या अशासकीय सदस्यांची निवड श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

     यामध्ये तालुकास्तरीय सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समितीच्या सदस्यपदी सुभाष मारुती अहिरे (धामोरी), नारायण सोपान बर्डे (टाकळी), सौ.भारती बाळू देवकर (टाकळी),बाळासाहेब पुंजाजी घायतडकर (रवंदे), रामदास भाऊसाहेब खटकाळे (लौकी), आत्मा समितीच्या सदस्य रोमेश श्रीकांत बोरावके (कारवाडी), सौ. जयश्री सुनील मलिक (कासली), सौ. सीता मोहन सोनवणे (सोनारी), सौ. रागिणी प्रकाश गवळी (मढी बु.), गणेश निवृत्ती घुमरे (हंडेवाडी), श्रावण निवृत्ती आसने (ब्राम्हणगाव), नगरपालिकास्तरीय  सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समिती प्रकाश सुखदेव दुशिंग,दिनकर खरे, सौ. माधवीताई राजेंद्र वाकचौरे, लक्ष्मण माधव सताळे, संदीप सावळेराम पगारे, रशिद बुढण शेख सर्व राहणार कोपरगाव, संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य सौ. साधना अनिल दवंगे (मुर्शतपूर), शंकरराव गहिनाजी चव्हाण (चांदेकसारे), श्रीधर दत्तू कदम (सुरेगाव), राजेंद्र रामचंद्र कोल्हे (देर्डे चांदवड), नारायण बारकुजी मांजरे (धामोरी), धर्मा शिवराम जावळे (सोनेवाडी), तालुकास्तरीय समन्वय व पुनर्विलोकन समिती सदस्य सुनील भास्कर मोकळ (मढी बु.), बाबुराव कारभारी थोरात (जवळके), सौ. चित्राताई मच्छिंद्र बर्डे (चासनळी), रोजगार हमी योजना समिती सदस्य अनिल मनोहर खरे (कारवाडी), राजेंद्र आण्णासाहेब पाचोरे (शहापूर), रविंद्र अशोक पिंपरकर (ब्राम्हणगाव) तालुकास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती सदस्य संतोष आण्णासाहेब पवार (आपेगाव) दुष्काळ निवारण समिती सदस्य विष्णू जयंतराव शिंदे (मुर्शतपूर), सौ. सुरेखा चंद्रभान बढे(कुंभारी), अवैध दारू प्रतिबंध समिती राजेंद्र शंकरराव निकोले (येसगाव) यांचा समावेश आहे.

                   सर्व विविध शासकीय समित्यांच्या अशासकीय नवनिर्वाचित सदस्यांचे ना. आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येक सदस्याने आपली जबाबदारी ओळखून समाजातील नागरिकांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवून त्यांना मदत करून दिलेली जबाबदारी पार पाडावी असे आवाहन केले आहे

Post a Comment

0 Comments