आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

पालिकेचा थकित कर भरून पालिकेला सहकार्य करा- मुख्याधिकारी शांताराम गोसावी. “घरपट्टी नळपट्टी भरण्यास नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद”


पालिकेचा थकित कर भरून पालिकेला सहकार्य करा- मुख्याधिकारी शांताराम गोसावी.

“घरपट्टी नळपट्टी भरण्यास नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद”                    



      कोपरगाव प्रतिनिधी:------    स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामकाजामध्ये शहरातील मालमत्ता कर, पाणी पट्टी, व्यवसायिक व इतर आस्थापनेवर आकारण्यात येणाऱ्या प्रत्येक कर रक्कमेची वसुली झाले नंतर त्या रक्कमेची शहरांमधील सोईसुविधा वाढवण्यासाठी उपयोग केला जातो. जर शहरातील नागरिकांनी आकारणी केले असलेला कर वेळेत स्थानिक स्वराज्य संस्थेकडे जमा केला नाही तर शहरातील नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधा जसे कि, विद्युत, स्वच्छता, रस्ते बांधकाम, पाणी व इतर मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रशासनाला अडचणी निर्माण होतात.

          याचा परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर तसेच एकूणच दैनंदिन जीवनावर होत असतो ही बाब लक्षात घेऊन कोपरगाव नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरांमधील नागरिकांची घरपट्टी व पाणीपट्टी, व्यवसायिक गाळा धारकाची कर वसुलीची मोहीम खूप यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचे नऊ पथक तयार करण्यात आले आहेत. सर्व पथक नियुक्त केलेल्या विविध भागांमध्ये नागरिक व व्यवसायिक यांच्या कडे जाऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांना नळपट्टी, घरपट्टी, व्यवसायिक कर नगरपरिषद कार्यालयाकडे जमा करण्यासंदर्भात आव्हान व विनंती करत आहेत या विनंतीला कोपरगावचे नागरिक चांगला प्रतिसाद देत आहे.

          सदर वसुली कामी मुख्याधिकारी सर्व पथकातील अधिकारी कर्मचारी यांचा दररोज आढावा घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना प्रशिक्षित करून वसूली संदर्भात नागरिकांसोबत कशा प्रकारे संवाद साधावा या अनुषंगाने सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या क्षमताची बांधणी केली जात आहे. त्याचाच परिणाम म्हणून शहरातील वसुली ही चांगल्या प्रकारे होत असून नागरिक देखील उत्तम प्रतिसाद देत आहे. याबद्दल सर्व नागरिकांचे मुख्याधिकारी तथा प्रशासक गोसावी यांनी आभार व्यक्त करून अभिनंदन केले आहे.

 त्याचप्रमाणे सर्व नागरिकांना आवाहन देखील केले आहे की, ज्या नागरिकांनी अद्याप पर्यंत आपली घरपट्टी, नळपट्टी, व्यवसायिक गाळा कर नगरपरिषद कार्यलया कडे जमा केलीली नाही. अशा सर्व जबाबदार नागरिकांनी आपल्या कडील येणे बाकी असलेली सर्व कर रक्कम विहित वेळेत भरावी व प्रशासनाला सहकार्य करावे. जेणेकरून कुठलीही कारवाई करण्यास प्रशासनाला भाग पाडू नये. तसेच आपल्याकडे येणाऱ्या कर वसुली पथकास योग्यते सहकार्य करावे.

Post a Comment

0 Comments