आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

एक्स सर्व्हिसमेन्स असोशियनकडूनॲडव्होकेट योगेश खालकर यांचा सन्मान.

 एक्स सर्व्हिसमेन्स असोशियनकडूनॲडव्होकेट योगेश खालकर यांचा सन्मान.
कोपरगाव प्रतिनिधी :----   कोपरगाव तालुक्यातील एक्स सर्विस मॅन असोशियन कडून सामाजिक कार्याची आवड असणारे वकिली व्यवसायात आपल्या कार्यकर्तृत्वामुळेच मानाचे स्थान निर्माण करणारे  ॲडव्होकेट योगेश साहेबराव खालकर यांचा नुकताच एक्स सर्विस मॅन असोशियन कडून असोशियन साठी विविध कामांकरिता दिलेल्या योगदानामुळे योगेश खालकर यांचा नुकताच यथोचित सन्मान करुन त्यांचा गौरव केला असोसिएशनचे अध्यक्ष म्हणाले की,   ॲडव्होकेट योगेश खालकर यांनी असोसिएशनच्या सर्व निवृत्त माजी सैनिकांच्या कोणत्याही प्रकारच्या खटल्यासाठी मोफतकायदेशीर सल्ला व त्याच प्रमाणे खटला चालविण्यासाठी कुठल्याही प्रकारचे आर्थिक योगदान न घेता केवळ सामाजिक बांधिलकीतून वेळोवेळी सर्व माजी सैनिकांना बहुमोल असे सहकार्य केले आहे त्यामुळे अनेक माजी सैनिकांचे कामेदेखील सोपस्कर झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले व ॲडव्होकेट योगेश खालकर यांचे आभार मानले.

यावेळी सत्काराला उत्तर देताना ॲडव्होकेट योगेश खालकर म्हणाले की, आपण सर्व नागरिक केवळ सैनिकांमुळे आपण सुरक्षित असून या सैनिकांचे आपल्या प्रती व देशाप्रती फार मोठे योगदान आहे त्यांच्या योगदानाची किंमत कुठल्याही प्रकारे होऊ शकत नाही सीमेवर लढताना अनेक सैनिक हे शहीद झाले असून अशा परिस्थितीमध्ये या कुटुंबावर फार मोठा आघात होत असतो अशावेळी सर्वांनी या कुटुंबीयांच्या मागे खंबीरपणे उभे राहणे महत्त्वाचे असते.

त्यामुळे आपण देखील त्यांच्याप्रती काहीतरी केले पाहिजे केवळ या उदात्त भावनेतून मी हे सर्व करत असून यापुढेही माझे हे कार्य असेच चालू राहणार आहे. असे ते शेवटी म्हणाले.

 यावेळी युवराज गांगवे अध्यक्ष एक्स सर्विस मॅन असोशियन भाऊसाहेब निंबाळकर,सचिव, वकील  संघाचे माजी अध्यक्ष जेष्ठ विधिज्ञ साहेबराव खालकर

 सुभाष गोसावी,दत्तु गांगवे,पंकज झावरे,मुणिर सय्यद,नाना गाडेकर, रवींद्र आचारी, बाळासाहेब रणशूर, विकास झिंजुर्डे,सागर शेंडगे,दशरथ साळवे, संदीप कोळपकर,  ॲडव्होकेट राहुल वाघचौरे,ॲडव्होकेट रमेश दुशिंग,  जेष्ठ पत्रकार नानासाहेब जवरे.आदि यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments