आमदार आशुतोष काळे यांचा निर्भिड इलेक्ट्रॉनिक पत्रकार संघाच्या वतीने सत्कार.
कोपरगाव प्रतिनिधी:----
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जगविख्यात असलेले शिर्डी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांची निवड झाल्या बद्दल निर्भीड इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघाच्या वतीने आज शनिवार दिनांक 8 जानेवारी 2022 रोजी सन्मान करण्यात आला आहे.
यावेळी सत्काराला उत्तर देताना आमदार आशुतोष काळे म्हणाले की, येणाऱ्या काळामध्ये साई बाबांच्या उपदेशा प्रमाणे समाजातील दिन दलित पिडीत घटकांची सेवा करण्याचा संधी आपल्याला मिळाली असून उपेक्षित घटकांना चांगल्या सुविधा देण्याचा मानस भविष्यात राहणार आहे.साई संस्थांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करावयाचा असून येणाऱ्या भविष्य काळामध्ये साई भक्तांना उच्च प्रतिच्या सुविधा उपलब्ध करणार आहे
यावेळी निर्भीड इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघ कोपरगावचे अध्यक्ष शैलेश शिंदे, उपाध्यक्ष योगेश डोखे, सचिव हाफिज शेख खजिनदार अनिल दीक्षित, शाम गवंडी, सुनिल सासणे, सागर जाधव, योगेश रुईकर आदी सदस्य उपस्थित होते.
0 Comments