आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कुंभारी, मळेगाव थडीच्या पाणी पुरवठा योजनांसाठी १७.५६ कोटी खर्चास प्रशासकीय मंजुरी – ना. आशुतोष काळे

 कुंभारी, मळेगाव थडीच्या पाणी पुरवठा योजनांसाठी

१७.५६ कोटी खर्चास प्रशासकीय मंजुरी – ना. आशुतोष काळेकोपरगाव प्रतिनिधी:---- मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनांचा प्रश्न श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून मार्गी लागला असून कोपरगाव तालुक्यातील कुंभारीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी ९.२३ कोटी व मळेगाव थडीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी ८.३३ कोटी असे एकूण रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव मतदार संघातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनांचा प्रश्न प्रलंबित होता. यापैकी बहुतांशी गावांची लोकसंख्या देखील जास्त आहे. अशा अनेक योजना प्रलंबित राहिल्यामुळे या योजनांच्या अंदाजपत्रकीय देखील खर्च  वाढले होते. त्यामुळे या पाणीपुरवठा योजना रुपये ५ कोटीच्या पुढे गेल्यामुळे या योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे वर्ग करण्यात आल्या होत्या. या गावांमध्ये पाण्यासाठी महिला वर्गाची होत असलेली अडचण ओळखून ना.आशुतोष काळे यांनी या योजनांना मंजुरी मिळावी यासाठी पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याला यश मिळाले असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जलजीवन मिशन योजनेंतर्गत काही दिवसापूर्वी कुंभारी व मळेगाव थडीच्या पाणीपुरवठा योजनांना तांत्रिक मंजुरी दिली होती या योजनांना प्रशासकीय मंजुरी मिळावी व पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने सुरु व्हावे यासाठी ना. आशुतोष काळे यांचा शासन दरबारी पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याची दखल घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या पाणीपुरवठा विभागाने कुंभारीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी ९.२३ कोटी व मळेगाव थडीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी ८.३३ कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता देऊन एकूण १७.५६ कोटीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे या दोन्ही गावातील अनेक वर्षापासुनचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे महिला वर्गांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. कुंभारी व मळेगाव थडीच्या नागरिकांनी व महिला-भगिनींनी ना.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.  कुंभारी व मळेगाव थडीच्या पाणीपुरवठा योजनांसाठी १७.५६ कोटीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल ना.आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे आ. आशुतोष काळे यांनी आभार मानले आहे

Post a Comment

0 Comments