Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

माध्यमिक शिक्षक सोसायटी करणार ७ टक्के कर्ज व्याज दर - प्रा. भाऊसाहेब कचरे

  माध्यमिक शिक्षक  सोसायटी करणार ७ टक्के कर्ज व्याज दर - प्रा. भाऊसाहेब कचरे

         


                            

कोपरगांव प्रतिनिधी:----- अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टिचर्स को-ऑफ  क्रेडीट सोसायटीच्या यशस्वी वाटचालीत माध्यमिक शिक्षकांचा फार मोठा सहभाग आहे. राज्यात या क्रेडीट सोसायटीचा नावलौैकिक असुन आदर्श  संस्था म्हणुन नावारूपाला आली आहे. निवृत्त शिक्षक सभासद रिकाम्या हाताने जावु नये म्हणुन दरवर्षी  अशा शिक्षकांचा यथोचित सत्कार करून त्यांना रू १४५०० इतका कृतज्ञता निधी देण्यात येतो, तसेच त्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात येतो. सध्या सभासद शिक्षकांना७. ५ टक्के व्याजदराने रू १९, १५,००० मर्यादे पर्यंत कर्ज दिल्या जाते. पुढील आर्थिक वर्षापासून  ही कर्ज मर्यादा वाढवुन फक्त ७ टक्के व्याद दराने कर्ज वितरीत केल्या जाईल, अशी घोषणा , पुरोगामी सहकार मंडळाचे सर्वेसर्वा, अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टिचर्स को-ऑफ  क्रेडीट सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान जेष्ठ  संचालक प्रा. भाऊसाहेब कचरे यांनी केली.

दि. २६  जानेवारी  रोजी कोपरगांव येथिल कोल्हे काॅम्प्लेक्सच्या सभागृहात अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टिचर्स को-ऑफ  क्रेडीट सोसायटीच्या कोपरगांव शाखेच्या वतीने निवृत्त शिक्षक सभासदांच्या प्रती कृतज्ञता सोहळा व सभासदांच्या पाल्यांच्या शैक्षणिक  उपलब्धींबाबत बक्षिसे देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. भाऊसाहेब कचरे प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. पत्रकार प्रा. साहेबराव दवंगे यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविले. यावेळी क्रेडीट सोसायटीचे उपाध्यक्ष आण्णासाहेब ढगे, संचालक चांगदेव खेमनर, सुर्यकांत डावखर, संजय कोळसे, पुडलिक बोठे,भास्करराव गुरसळ, पुरोगामी सहकार मंडळाचे सचिव बबनराव लबडे, माजी संचालक जाकिर सय्यद, बाळासाहेब सोनवणे, आदी व्यासपीठावर उपस्थित होते.  सदर प्रसंगी विनृत्त सभासद, सभासदांचे पाल्यही उपस्थित होते.

सुरूवातीस प्रा. बाळासाहेब सोनवणे यांनी प्रास्तविक भाषणातुन सर्वांचे स्वागत केले. ते म्हणाले की अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टिचर्स को-ऑफ  क्रेडीट सोसायटीला फार मोठी परंपरा असुन सभासदांना फायदा कसा होईल याचा सातत्याने विचार केला जातो. मयत सभासदांचे संपुर्ण कर्ज माफ करून वारसांना शेअर्स व ठेव रक्कम परत केल्या जाते. कन्यादान - भाग्यलक्ष्मी योजने अंतर्गत सभासदांच्या मुलींच्या विवाह प्रसंगी रू १५,००० ची रक्कमही दिल्या जाते. सभासदांचा रू १,००, ००० पर्यंतचा जनता अपघात विमा काढला जातो. सेवानिवृत्त सभासदांना रू १४,५०० चा कृतज्ञता निधी दिला जातो. देश  सेवेचे कर्तव्य बजावत असताना वीर मरण प्राप्त झाल्यामुळे जिल्ह्यातील शहिद जवानांच्या कुटूंबियांस रू ५१,०००० ची आर्थिक मदत दिल्या जाते. अशा  कल्याणकारी योजनांमुळे माध्यमिक शिक्षक  क्रेडीट सोसायटीने जिल्ह्यात  वेगळी ओळख निर्माण केली आहे.

प्रा. कचरे पुढे म्हणाले की माध्यमिक शिक्षक  क्रेडीट सोसायटीचे वैशिट्य म्हणजे सभासदांच्या कर्जावर चक्रवाढ व्याज न लावणे. कोविड १९ च्या आाजारामुळे चालु वर्षी ६२ सभासद मयत झाले. त्यांचे संपुर्ण कर्ज माफ करून वारसांना ठेवी देण्यात आल्या. अशी एकमेव संस्था महाराष्ट्रातील  आहे. इतर संस्थाना ठेवी गोळा करण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतात, परंतु या संस्थेत दर महिण्याला रू ३ कोटीच्या ठेवी गोळा होतात, हे या संस्थेच्या विश्वासाचे  प्रतिबिंब आहे. ही संस्था अनेकांच्या प्रपंच्याची अविभाज्य भाग बनली आहे.

सदर प्रसंगी निवृत्त उपप्राचार्य नारायण बारे, अशोकराव  ढेपले, विध्यार्थिनी श्रेया  रावुत यांनीही मनोगत व्यक्त करून संस्थेप्रती आदर व्यक्त केला.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रा. साहेबराव दवंगे म्हणाले की निवृत्त शिक्षकांनी आयुष्यभर ज्ञानदानाचे कार्य करून सुसंस्कारीत हजारो नागरीक घडविले. आयुष्याच्या  वाटेवर त्यांचा आदर करणारे विध्यार्थी म्हणजेच त्यांच्या बॅन्केतील ठेवी सारखे आहे. गुणवंत विध्यार्थ्यांना मार्गदर्शन  करताना ते म्हणाले की  आयुष्यात  सकारात्मक राहिल्यास अर्धे काम झाल्यासारखेच असते.

 दिपक बुधवंत यांनी सुत्रसंचालन केले तर प्रा. सुरेश  देवरे यांनी आभार माणले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोपरगांव शाखा अधिकारी श्री नितीन होन, सागर सातपुते व संकेत गमे यांनी विशेष  परीश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments