पवारांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगावात राष्ट्रवादीची व्हर्च्युअल रॅली कार्यक्रम.
कोपरगाव प्रतिनिधी:---- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार (दि.१२) रोजी आयोजित करण्यात आलेल्या व्हर्चुअल रॅली कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण श्री साईबाबा साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून कृष्णाई मंगल कार्यालय, कोपरगाव येथे करण्यात येणार असल्याची माहिती कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी व शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार येत्या १२ डिसेंबरला ८१ व्या वर्षांत पदार्पण करत आहेत. पवार साहेब मागील सहा दशकापासून देशाच्या राजकारणात सक्रीय आहेत. पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअल रॅली ही मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत कोरोना नियमांचे पालन करून रविवार १२ डिसेंबर रोजी नेहरू सेंटर वरळी येथे सकाळी ११ ते १ या वेळेत पार पडणार आहे. वाढदिवसानिमित्त होणाऱ्या ह्या अभूतपूर्व व्हर्च्युअल रॅलीचे थेट प्रक्षेपण कोपरगाव येथे करण्यात येणार आहे. व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना पवार साहेबांचे अनमोल विचार ऐकता यावे कार्यकर्त्यांना व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून पवार साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून व्हर्चुअल रॅली कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी व शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी केले आहे.
0 Comments