आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

५ नं. साठवण तलाव, वितरीकांबाबत विरोधक पसरवित असलेला संभ्रम हा अप्रत्यक्षपणे ५ नं. साठवण तलावालाच विरोध – पद्माकांत कुदळे


५ नं. साठवण तलाव, वितरीकांबाबत विरोधक पसरवित असलेला संभ्रम

हा अप्रत्यक्षपणे ५ नं. साठवण तलावालाच  विरोध – पद्माकांत कुदळे




कोपरगाव प्रतिनिधी:----  कोपरगाव शहरातील नागरिकांना नियमित पाणी मिळावे यासाठी ५ नं. साठवण तलाव गरजेचा आहे व सर्व नागरिकांना पूर्ण क्षमतेने समसमान पाणी मिळावे यासाठी वितरिकांची भूमिका देखील अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे श्री. साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी काही दिवसांपूर्वी ५ नं. साठवण तलाव व वितरीकांसाठी १२० कोटीची तांत्रिक मंजुरी मिळविली आहे. मात्र नागरिकांची तहान भागणार असल्याचे विरोधकांना सहन होत नसून त्यांनी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे सुरु केलेले काम हा विरोधकांचा अप्रत्यक्षपणे ५नं. साठवण तलावालाच विरोध असल्याचे कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.   


दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, कोणत्याही शहराला कोणत्याही धरणातून येणारे पाणी जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून शुद्धीकरण करूनच वितरिकांद्वारे नागरिकांना पुरवठा केला जातो. कोपरगाव शहरातील नागरिकांसाठी पाणी कुठून येते हे महत्वाचे नसून येणारे पाणी साठविण्यासाठी साठवण क्षमता महत्वाची आहे. त्याचबरोबर सर्व नागरिकांना समप्रमाणात पुरवठा होण्यासाठी वितरिका देखील तेवढ्याच महत्वाच्या आहेत. त्यामुळे श्री. साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी निवडून येताच ५ नं. साठवण तलावाची मोहीम हातात घेवून प्राथमिक स्वरूपातील काम पूर्ण केले आहे. व काही दिवसांपूर्वी पुढील कामासाठी तसेच वितरीकांसाठी १२० कोटी रुपयांची तांत्रिक मंजुरी देखील मिळविली आहे. त्याच बरोबर कोपरगाव शहरासाठी यापूर्वी ५.९६ एमएलडी पाणी आरक्षित होते त्यामध्ये वाढ करून आ. आशुतोष काळे यांनी ३.३६ एमएलडी वाढीव पाणी आरक्षित करून घेतले आहे. काही दिवसातच ५ नं. साठवण तलावाचे काम सुरु झाल्याचे नागरिकांना दिसणार आहे. मात्र ज्यांच्याकडे सत्ता असतांना त्यांना ५ नं. साठवण तलावाचा प्रश्न सोडविता आला नाही. त्यांनी ५ नं. साठवण तलाव व वितरीकांबाबत नागरिकांमध्ये संभ्रम पसरविण्याचे काम सुरु करून त्यांचा अप्रत्यक्षपणे ५ नं. साठवण तलावाला विरोधच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तुम्ही कितीही संभ्रम निर्माण करा जनता सुज्ञ आहे असे पद्माकांत कुदळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात शेवटी म्हटले आहे.   


चौकट :- कालव्यांच्या माध्यमातून अनेक शहरांना पाणी पुरवठा केला जातो. त्याप्रमाणे मागील अनेक दशकांपासून कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावात कालव्यातुनच येणारे पाणी साठवून ते जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध करून नागरिकांना मिळत आहे. आजवर हे पाणी कधीच कुणाला अशुद्ध वाटले नाही कारण कधीच कुणाचे पोट दुखले नाही. मात्र पाण्यावर चालणारे राजकारण ५ नं. साठवण तलाव होणार असल्यामुळे संपुष्टात येईल त्यामुळे काहींची पोटदुखी वाढली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये गैरसमज व संभ्रम निर्माण करण्यासाठी चौका-चौकात प्रसिद्धी केली जात आहे. - पद्माकांत कुदळे 

Post a Comment

0 Comments