आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

विकास कामे मार्गी लावण्यासाठी नगरपालिकेची सत्ता ताब्यात द्या.---- आमदार आशुतोष काळे.

 विकास कामे मार्गी लावण्यासाठी  नगरपालिकेची सत्ता ताब्यात द्या.---- आमदार आशुतोष काळे.


कोपरगाव प्रतिनिधी:----- आगामी काळात आपले सर्व कामे मार्गी लावण्यासाठी आपण कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत आपल्या उमेदवारांना आपण बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले 

कोपरगाव शहरातील  दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या बांधण्यात आलेल्या ब्रिटीशकालीन इमारतींची दुरावस्था झालेल्या दिवाणी न्यायालय इमारतीसाठी विधी व न्याय विभागाकडून ३८ कोटी ६३ लाख ४९ हजार रुपये निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांचा सत्कार कोपरगाव वकील संघाने आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते.या प्रसंगी कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष विद्यासागर शिंदे,अॕड.गणेश मोकळं,खजिनदार गणेश भोकरे,माजी अध्यक्ष अड. शिरीशकुमार लोहकणे, अॕड.जपे, अॕड.अशोक देशमुख,अॕड.एम.पी.येवले,बांधकाम विभागाचे सहायक अभियंता प्रशांत वाकचौरे,पाटील,अड.बाळासाहेब कडू,अड.शंतनू धोर्डे,संजय भोकरे,विरेन बोरावके,रमेश गवळी,अड.योगेश खालकर,अड.शंकरराव यादव,अड.गौरव गुरसळ,अड.महेश भिडे ,महेश सोनवणे,अड.वैभव बागुल आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की,”आपली शिर्डी येथील साई संस्थानच्या अध्यक्षपदी निवड झाली पण अधिभार घेण्यासाठी अडचणी येत होत्या व आपण नुसते नावाचे अध्यक्ष होतो मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने आपल्याला कार्यभार मिळाला आहे. मात्र वकील संघाचे नूतन अध्यक्ष विद्यासागर शिंदे यांनी कायदेशीर मदत केल्याने आपल्याला कार्यभार घेण्याची संधी मिळाल्याचे ऋण निर्देश व्यक्त केले. कोपरगाव साठवण तलावाचे पाणी लवकरात लवकर देण्यासाठी आपण लवकरच प्रशासकीय मान्यता घेऊन हा प्रश्न मार्गी लावू व ही समस्या दूर करू असेही आमदार काळे शेवटी म्हणाले.

Post a Comment

0 Comments