आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

संघर्षातून माणसाचे आयुष्य घडते – राजू फुलसिंग चौरे.

 संघर्षातून माणसाचे आयुष्य घडते –  राजू फुलसिंग चौरे.

 


कोपरगाव प्रतिनिधी:----  कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात संघर्ष अटळ आहे, त्यातही दिव्यांग व्यक्तींच्या वाट्याला अधिक संघर्ष येतो. समाजाची अवहेलना सहन करीत त्यांना जगावे लागते. अशा परिस्थितीत न डगमगता जिद्दीने केलेले प्रयत्न व संघर्षातून कोणत्याही माणसाचे आयुष्य घडते असे मत कोपरगाव तहसिल कार्यालयातील अव्वल कारकून   श्री. राजू फुलसिंग चौरे यांनी व्यक्त केले. 

येथील श्री सदगुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस् अॅण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेजमध्ये विद्यार्थी  विकास मंडळ अंतर्गत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रंगी आपला संघर्षमय प्रवास मांडून त्यांनी विद्यार्थ्यांपुढे आदर्श उभा केला. 

     अध्यक्षीय विचार व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर थोपटे म्हणाले की, समाजामध्ये सर्व पातळीवर समानतेची भावना प्रस्थापित झाल्याशिवाय विकास साधला जाणार नाही. विशेषतः दिव्यांग जनांप्रती असलेली आदराची भावना त्यांचे आयुष्य अधिक आनंदी बनवू शकते. म्हणून प्रत्येकाने समाजातील दिव्यांगाप्रती आत्मीयताभाव जोपासावा. सदर प्रसंगी कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. सुभाष रणधीर, हिंदी विभाग प्रमुख डॉ. ओमप्रकाश मौर्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयातील दिव्यांग कर्मचारी व विद्यार्थी यांचा यावेळी गुलाबपुष्प देवून सन्मान करण्यात आला.  

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. माधव यशवंत यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. कैलास महाले यांनी केले. अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सुनील सालके  यांनी आभार मानले 

    सदर प्रसंगी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. विजय निकम यांच्यासह  शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments