जनता विकासाच्या पाठीशी नेहमी उभी राहते - आ. आशुतोष काळे
कोपरगाव प्रतिनिधी:---- मतदार संघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने प्रत्येक गावाला समान न्याय देत आहे. त्यामुळे एखाद्या गावात सत्ता असो वा नसो त्या गावातील नागरिकांपर्यंत विकास पोहचविणे हे माझे कर्तव्य असून जनता विकासाच्या मागे उभी राहते. यावर माझा विश्वास आहे असे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी संवत्सर येथे केली.
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे रवंदे-टाकळी-पवार गिरणी-संवत्सर-भोजडे-धोत्रे जिल्हा हद्द रस्ता (प्रजिमा ५) किमी १३/५०० ते १७/३०० मध्ये (शिंगणापूर चौकी ते संवत्सर) रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, जनता विकासाच्या प्रतिक्षेत होती. विधानसभा निवडणूक पार झाल्यापासून मतदार संघाच्या विकासासाठी निधीचा रतीब लावला आहे. जीवघेण्या कोरोनामुळे अर्थव्यवस्था अडचणीत असतांना देखील त्याचा परिणाम मतदार संघाच्या विकासावर होऊ दिला नाही. विकासाचा अनुशेष भरून काढायचा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक गावपातळीपर्यंत विकास पोहचविणे हे ध्येय ठेवले आहे. त्यामुळे जरी एखाद्या गावात सत्ता नसली तरी त्या गावापर्यंत सुद्धा विकास पोचवणारच आहे. जनतेला विकास पाहिजे. जनतेच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण झाल्या की जनता विकासाच्या मागे उभी राहते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यावर भर द्यावा असे आवाहन केले.
यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक बाळासाहेब बारहाते, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, दिलीप बोरनारे, बाबासाहेब कासार, बाळासाहेब जगताप, बाळासाहेब आबक, तुषार बारहाते, बबनराव बारहाते, गोवर्धन परजणे, राजेंद्र भाकरे, सुनील कुहिले, राहुल जगधने, पी.डी. आहेर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दहिफळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments