आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

रस्त्यांच्या गुणवत्तेत तडजोड केली जाणार नाही – आ. आशुतोष काळे

 

  कोपररस्त्यांच्या गुणवत्तेत तडजोड केली जाणार नाही – आ. आशुतोष काळेकोपरगाव प्रतिनिधी:----- मतदार संघातील रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेमुळे नागरिकांनी आजवर मोठा त्रास सहन केला आहे. एकाच रस् निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे होणारे सर्वच रस्ते गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक असून रस्त्याच्या गुणवत्तेत तडजोड केली जाणार नाही असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.

                कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे आज २ कोटी रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या धारणगाव-कुंभारी- माहेगाव देशमुख-सुरेगाव ते रामा ७ (प्रजिमा ८५) रस्ता किमी १/८०० ते ५/०० मध्ये (कोळपेवाडी-माहेगाव देशमुख शिव ते कुंभारी गणपती मंदिर) डांबरीकरण करणे कामाचे भूमिपूजन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने होत्या.

                यावेळी पंचायत समितीचे उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी सहकारी साखर कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे, अरुण चंद्रे, कामगार संचालक अरुण पानगव्हाणे, संभाजीराव काळे, माहेगाव देशमुख सोसायटीचे चेअरमन रविंद्र काळे, सुंदरराव काळे, प्रल्हाद काळे, के.पी. रोकडे उपस्थित होते.पुढे बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील नागरिकांना कोपरगावला जाण्यासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या सुरेगाव-धरणगाव या रस्त्याची दुरावस्था झाली होती.त्यासाठी निवडून येताच या रस्त्यासाठी निधी मिळावा यासाठी अथक पाठपुरावा करून मोठ्या प्रमाणात निधी मिळविला आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम देखील दर्जेदार होणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी कायम पाणी साचून रस्ता खराब होतो त्याठिकाणी योग्य उपाययोजना केल्या जाणार आहेत.  मतदार संघातील रस्त्यांसाठी आजवर प्रतिकूल परिस्थितीत ९० कोटी पेक्षा जास्त निधी आणला आहे. भविष्यात देखील मतदार संघातील सर्वच खराब रस्त्यांना निधी आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत त्याला देखील लवकरच यश मिळेल. मतदार संघाच्या विकासासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात मदत झाली असून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. राजश्रीताई घुले यांची मोठे सहकार्य मिळाले आहे. नागरिकांना अपेक्षित असलेला विकास साध्य करण्यासाठी नागरिकांच्या मागणी अगोदरच प्रस्ताव शासनदरबारी सादर केले आहेत. त्यामुळे नागरिकांनी निर्धास्त रहावे. व येणाऱ्या सर्वच निवडणुकात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार निवडून द्यावे असे आवाहन केले.

            याप्रसंगी भास्करराव काळे, बापूसाहेब जाधव, सुखदेव काळे, संभाजीराव दत्तात्रय काळे, कुंभारीचे सरपंच प्रशांत घुले, हिंगणीचे सरपंच धनराज पवार, माहेगाव देशमुखचे उपसरपंच विकास रणसिंग, कुंभारीचे उपसरपंच दिगंबर बढे, शिवाजीर घुले, प्रकाश काळे, इंद्रभान पानगव्हाणे, भरत पानगव्हाणे, रावसाहेब पानगव्हाणे, चंद्रकांत कापसे, शिवाजी काळे, सोपान ठाणगे, रावसाहेब काळे, बाळासाहेब पानगव्हाणे, नंदकिशोर निंबाळकर, अण्णासाहेब बढे, बाळासाहेब पवार, नारायण काळे, नंदकुमार चव्हाण, ज्ञानेश्वर काळे, राधाकिसन काळे, एकनाथ लांडगे, सागर पवार, विलास दवंगे, सरदार पठाण, फक्कड आदमने, संजय वाघ, बाळासाहेब खोंड, उल्हास काळे, वसंत घुले, राहुल जगधने, बाबासाहेब पानगव्हाणे, माधवराव लामखडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे गाडे, ग्रामसेवक गोरक्षनाथ शेळके आदी मान्यवरांसह माहेगाव देशमुख व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित

Post a Comment

0 Comments