आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

गं भा. अंजनाबाई औताडे यांचे निधन

 गं भा. अंजनाबाई औताडे यांचे निधन



कोपरगाव प्रतिनिधी:------- कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे राहणाऱ्या जुन्या पिढीतील ग.भा. अंजनाबाई वामनराव  पाटील औताडे यांचे बुधवार दिनांक ८ डिसेंबर रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. ग.भा. अंजनाबाई औताडे या अत्यंत धार्मिक वृत्तीच्या व मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक निराधारांना आश्रय दिला होता. अनेकांना मायेची उब

 दिली होती. त्यांच्या जाण्याने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा नानासाहेब वामनराव पाटील औताडे, सुनील वामनराव पाटील औताडे तसेच मुलगी सौ. मंदाकिनी दिलीपराव पाटील बनकर यांच्या त्या आई होत्या तर निफाड मतदार संघाचे आमदार दिलीप काका बनकर यांच्या त्या सासु होत्या. त्यांच्यावर पोहेगाव येथे सकाळी 11 वाजता भावपूर्ण वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोहेगाव पंचक्रोशीतील विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments