आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

मा.आ. अशोकराव काळे यांचे स्वप्न आ. आशुतोष काळेंनी केले पूर्ण गोदावरी नदीवरील वारी पुलासाठी २० कोटी निधी मंजूर

 मा.आ. अशोकराव काळे यांचे स्वप्न आ. आशुतोष काळेंनी केले पूर्ण

गोदावरी नदीवरील वारी पुलासाठी २० कोटी निधी मंजूर

          

कोपरगाव प्रतिनिधी:---- माजी आमदार अशोकराव काळे यांनी विरोधी पक्षाचे आमदार असतांना देखील धारणगाव-कुंभारी, चास नळी, कोपरगाव शहरातील बेट भागाला जोडणारा पूल, अहमदनगर-मनमाड महामार्गावरील जुन्या पुलाला समांतर पूल असे गोदावरी नदीवर अनेक ठिकाणी मोठे पूल बांधण्यात यश मिळविले. त्याप्रमाणे वारी येथे देखील गोदावरी नदीवर पूल बांधण्यासाठी त्यांचा मनोदय होता व त्यासाठी पाठपुरावा देखील सुरु होता. मात्र २०१४ ला झालेल्या सत्तांतरामुळे या पुलाकडे दुर्लक्ष झाले. गोदावरी नदीवरील वारी पुलाचे मा.आ.अशोकराव काळे यांचे स्वप्न अपूर्ण राहून नागरिकांचे वर्षानुवर्षापासून सुरु असलेले हाल अजूनही सुरूच होते. याची श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी दखल घेऊन या पुलासाठी निधी मिळावा यासाठी महाविकास आघाडी सरकारकडे पाठपुरावा करीत होते. त्या पाठपुराव्याला यश मिळाले असून हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी अर्थसंकल्पात वारी येथील गोदावरी नदीवरील पुलासाठी तब्बल २० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

            कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील (प्रजिमा १३ वरील) सावळीविहीर, रुई, वारी-कान्हेगाव, सडे, शिंगवे, भोजडे, शिरसगाव, सावळगाव आदी गावातील नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला वारी येथील गोदावरी नदीच्या पुलाचा प्रश्न मागील पाच-सहा दशकांपासून प्रलंबित होता. पावसाळ्यात गोदावरी नदीचा विसर्ग वाढल्यानंतर पुलावर पाणी येऊन दोनही बाजूंची वाहतूक ठप्प होत असे. त्याचबरोबर जोपर्यंत पुलावरील पाणी ओसरत नाही तोपर्यंत शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना घरीच राहावे लागत होते किंवा दूरच्या मार्गाचा अवलंब करावा लागत असे.तसेच औरंगाबाद जिल्ह्यातून शिर्डी येथे साई पालख्यांसमवेत येणाऱ्या हजारो साईभक्तांची देखील या पुलामुळे गैरसोय होत होती. त्यामुळे हा पूल व्हावा अशी अनेक वर्षापासूनची वारी व पंचक्रोशीतील नागरिकांची मागणी होती. हि मागणी माजी आ.अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र २०१४ ला सत्तांतर झाल्यामुळे वारी पुलाचा प्रश्न प्रलंबितच होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर आ.आशुतोष काळे यांनी वारी येथील पुलाचा प्रश्न सोडविणार असल्याचे वारीसह परिसरातील नागरिकांना आश्वासित केले होते. दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा चालू होता. त्या पाठपुराव्याला अपेक्षित यश मिळाले आहे. सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी अर्थसंकल्पात महाविकास आघाडी सरकारने या पुलासाठी २० कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. त्याबद्दल आ.काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्ता भरणे यांचे आभार मानले आहे.

चौकट :- आ.आशुतोष काळे यांनी निवडून आल्यापासून मतदार संघातील प्रत्येक गावाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागत आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील वारी येथील गोदावरी नदीचा पूल व अनेक वेळा परत गेलेल्या वारी-कान्हेगाव संयुक्त पाणी पुरवठा योजनेचा वर्षानुवर्षांपासूनचा प्रश्न देखील आ.आशुतोष काळे यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सोडविला. त्यामुळे पूर्व भागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून याचा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फायदा होणार आहे. परंतु त्याचबरोबर माजी आ.अशोकराव काळे यांचे वारी पुलाचे स्वप्नदेखील आ.आशुतोष काळे यांनी दोनच वर्षात पूर्ण करून दाखविले आहे

Post a Comment

0 Comments