आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

शरद पवार साहेबच देशाचे नेतुत्व करू शकतात मोदी संकट दूर करण्यासाठी देशाला पवार साहेबच पंतप्रधान हवे – आ. आशुतोष काळे

  


शरद पवार साहेबच देशाचे नेतुत्व करू शकतात

मोदी संकट दूर करण्यासाठी देशाला पवार साहेबच पंतप्रधान हवे – आ. आशुतोष काळे

येणाऱ्या सर्वच निवडणुकात राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून देवून पवार साहेबांना वाढदिवसाची भेट द्या



   कोपरगाव प्रतिनिधी:--- देशात मागील काही वर्षापासून निर्माण झालेल्या अडचणीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार बाहेर काढू शकतात. त्यांच्याकडे असलेल्या प्रदीर्घ अनुभव आजमितीला देशातील कोणत्याही नेत्याकडे नाही. देशाचे नेतृत्व करण्याचे सामर्थ्य शरद पवार साहेबांकडे असून देशावर आलेलं मोदी संकट दूर करण्यासाठी पवार साहेबच देशाचे पंतप्रधान हवे असे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.


                राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त सोमवार (दि.०६) रोजी कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिसंवाद कार्यकर्ता मेळावा श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना आपल्या अध्यक्षीय भाषणात आ.आशुतोष काळे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे माहिती तंत्रज्ञान सेलचे प्रदेशाध्यक्ष जितेन सरडे, वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.तुषार वाघमारे उपस्थित होते.

           पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, आपल्या देशावर आजवर अनेक भूकंप,पूर,अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्ती आल्या, अनेक पेचप्रसंग निर्माण झाले त्यावेळी या आपत्तीतून देशाला सावरण्यासाठी पवार साहेबांचे मार्गदर्शनच उपयोगी पडले आहे. आजही देशाची परिस्थिती अवघड आहे. कोरोना सारखी वैश्विक महामारी पाठ सोडायला तयार नाही. काही निर्णय चुकीचे झाल्यामुळे अर्थव्यवस्थेला लगाम बसला. त्याचा परिणाम सर्व सामान्य नागरिकांवर होवून त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत देशाला सक्षम नेतृत्वाची गरज आहे. देशाला सर्वच आघाड्यांवर भक्कम करण्यासाठी पवार साहेबांकडे सर्वच क्षेत्राचा मोठा अनुभव असून त्यांचे प्रगल्भ नेतृत्वच देशाला सर्व संकटातून बाहेर काढू शकते व देशाची विस्कटलेली घडी पूर्वपदावर येवू शकते. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात व राज्यात मजबूत करून पवार साहेबांच्या मागे मोठी ताकद उभी करणे हे राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. त्यासाठी शेतकरी, कष्टकरी, व्यापारी आदींसह सर्व सामान्य नागरिकांचे हित जोपासणारे पवार साहेबांचे विचार घराघरात पोहोचवा. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणून पवार साहेबांना वाढदिवसाची भेट द्या असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी यावेळी केले.यावेळी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त महिला बचत गटांना ३९ लाख ५५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.

             यावेळी वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.तुषार वाघमारे म्हणाले की, असामान्य माणसाची प्रत्येक गोष्ट असामान्य असते. त्यामुळे पवार साहेबांचा वाढदिवस देखील असामान्य असतो. प्रत्येक वाढदिवस साजरा करताना देशाचा विचार केला आहे. २०१९ पूर्वी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असतांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी २०१९ चा वाढदिवस शेतकरी कृतज्ञता वर्ष म्हणून साजरा करून कार्यकर्त्यांनी स्वेच्छेने पैसे जमा करून ते पैसे राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना दिले. २००९ ला ग्लोबल वार्मिंग वाढल्यामुळे गव्हाचे व कडधान्याचे उत्पादन घटले होते. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने २००९ ला पवार साहेबांचा वाढदिवस ग्लोबल वार्मिंग जनजागृती दिवस म्हणून साजरा केला होता. देशावर आलेल्या प्रत्येक संकटाकडे नागरिकांनी गांभीर्याने पहावे हा त्यामागचा उद्देश होता. पवार साहेबांचा वाढदिवस देशावर आलेल्या संकटाकडे लक्ष वेधण्यासाठी साजरा केला जातो. आजही देश मोठ्या संकटात असून देशावर आलेल्या मोदी संकटाची जाणीव वाढदिवसानिमित करून द्यायची आहे त्यावर उपाय करायचा आहे.

           पवार साहेबांचे राज्यासाठी व देशासाठी मोठे योगदान आहे. राज्याला यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि पवार साहेबांचे नेतृत्व मिळाल्यामुळे राज्य आघाडीवर आहे. प्रत्येक क्षेत्रातील क्रांतीचे जनक पवार साहेब असून त्यांच्यामुळे अन्नधान्य आयात करणारा आपला देश अन्नधान्य निर्यात करणारा देश झाला आहे. कृषी क्षेत्रात साहेबांनी दिलेल्या योगदानामुळे शेतकरी खऱ्या अर्थाने सक्षम झाला. महिलांना सन्मान देण्याचे काम करून महिला किती सक्षम आहे त्यांनी दाखवून दिले. देशातून, परदेशातून अनेक उद्योग महाराष्ट्रात आणून युवकांना रोजगार उपलब्ध करून दिले. आज तरुणांच्या हाताला काम नाही. संकट खूप मोठे आहे. त्यामुळे प्रबोधन देखील मोठे होणे गरजेचे आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील यांनी वाढदिवसाचे औचीत्य साधत कार्यकर्ता मेळाव्यातून चर्चा घडवून आणली आहे. संकट मोठे आहे यातून आत्ताच बाहेर पडणे गरजेचे आहे. उद्योग,कृषी, महिला धोरण, साहित्य,कला, संस्कृती, खेळ अशा सर्वच क्षेत्रात साहेबांचे अजोड योगदान आहे. देशाच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हवे ते संख्याबळ देण्यात कमी पडलो. ती जबाबदारी ओळखून देशावर आलेलं हे संकट दूर करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

            याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, कारभारी आगवण, पद्माकांत कुदळे, शहराध्यक्ष सुनिल गंगुले, ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष रमेश गवळी, युवक जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा आढाव, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, महिला शहराध्यक्ष सौ. प्रतिभा शिलेदार, महिला जिल्हा सचिव सौ. रेखा जगताप,युवती तालुका अध्यक्षा सौ. वैशाली आभाळे, युवती शहराध्यक्षा सौ. माधवी वाकचौरे,सांस्कृतिक सेलचे तालुकाध्यक्ष रमेश टोरपे, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे व्हा. चेअरमन सुधाकर रोहोम, सर्व संचालक मंडळ, पंचायत समितीचे उपसभापती अर्जुन काळे, सर्व सदस्य, तसेच जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, सर्व सेलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments