आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून कोपरगाव शहरासाठी २.३१ कोटी निधी – आ.आशुतोष काळे

 लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून

कोपरगाव शहरासाठी २.३१ कोटी निधी – आ.आशुतोष काळे



कोपरगाव प्रतिनिधी:----  लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना २०२१-२२ करीता कोपरगाव शहराच्या विकासासाठी २ कोटी ३१ लाख ७४ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघाबरोबरच कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. त्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळत असून मतदार संघाच्या विकासाला आजवर कोट्यावधी रुपयांचा निधी महाविकास आघाडी सरकारकडून आणला आहे. मागील महिन्यात (दि.८) रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री ना. हसनजी मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना २०२१-२२ करीता मंजूर निधीचे वितरण निश्चित करणेसाठी बैठक पार पडली होती. या बैठकीत कोपरगाव शहरासाठी जास्तीत जास्त निधी द्यावा अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली होती. त्या मागणीचा पालकमंत्र्यांनी सकारात्मकपणे विचार करून केलेल्या मागणीनुसार कोपरगाव शहराला २ कोटी ३१ लाख ७४ हजार रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून कोपरगाव शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे. कोपरगाव नगरपरिषदेने याबाबत तातडीने पुढील कार्यवाही करावी अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना दिल्या असून शहरविकासासाठी मोठ्याप्रमाणात निधी दिल्याबद्द्ल जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री ना. हसनजी मुश्रीफ यांचे आभार मानले आहे

Post a Comment

0 Comments