आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

घारी, मोर्वीस ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत काळे गटाची सरशी.

 घारी, मोर्वीस ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत काळे गटाची सरशी.



 कोपरगाव प्रतिनिधी:-----  कोपरगाव तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या घारी, मोर्वीस ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत आ. आशुतोष काळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले आहे.

        कोपरगाव तालुक्यातील घारी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य शांतीलाल पवार यांचे  निधन झाल्यामुळे व मोर्वीस ग्रामपंचायतीच्या सदस्याच्या रिक्त असलेल्या जागेसाठी  दोनही ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या पोट निवडणुकीत सुजान मतदारांनी घारी ग्रामपंचायत मध्ये संदीप रंगनाथ पवार व मोर्विस येथील सौ. सविता जनार्दन पारखे या काळे गटाच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून दिले आहे. विजयी उमेदवारांचे मा. आ. अशोकराव काळे, आ. आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. कार्यकर्त्यांनी यावेळी जल्लोष करून आपला आनंद व्यक्त केला.


                    यावेळी घारीचे सरपंच रामदास जाधव, उपसरपंच ठकुबाई काटकर, शिवाजी जाधव, सर्जेराव सोनवणे, प्रभाकर आहिरे, शंकरराव सोनवणे, संतोष पगारे, निलेश वाघ, सिताराम वाघ, सिताराम जाधव, नामदेव जाधव, सुभाष पारखे, अक्षय सोनवणे, जनार्दन पारखे, प्रकाश सोनवणे, भगवंत सोनवणे, गोरक्षनाथ पारखे, राहुल पारखे, कमलाकर जाधव, लक्ष्मण पवार, किरण पवार, कांतीलाल पवार, हरीलाल पवार, हुसेन पठाण, दादा पठाण, रफिक पठाण, शिवाजी बर्डे, रामकीसन काटकर, अजित पवार, विजय पवार, ज्ञानेश्वर पवार, देविदास पवार, संदीप पवार, परसराम जाधव, रवींद्र पवार, आप्पासाहेब पवार, नारायण पवार, शांतीलाल पवार, भाऊसाहेब होन, सुनील गोधडे, वसीम पठाण, सौरभ पवार, सतिश पवार, राजकिशोर जाधव, संपत पवार, भानुदास होन, संजय पवार, परमानंद होन, नितीन पवार, शांतीलाल साहेबराव होन, सुनील पवार, अनिल पवार, अक्षय झाल्टे, सुदर्शन होन आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments