विकासाला विरोध करणाऱ्या विघातक प्रवृत्तींना सत्तेपासून दूर ठेवा – आ. आशुतोष काळे
कोपरगाव प्रतिनिधी:----- २०१६ ला कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सात नगरसेवक निवडून आले. हे सातही नगरसेवक निवडून आल्यापासून नेहमीच विकासाच्या बाजूने उभे राहून त्यांनी आजवर विकासाला साथ दिली आहे. परंतु शहरातील नागरिकांनी ज्यांना ज्या विश्वासाने कोपरगाव नगरपरिषदेत बहुमत देवून सत्ताधारी बनवले. त्यांनी शहरविकासाला विरोध करून नागरिकांचा विश्वासघात केला आहे. अशा विकासाला विरोध करणाऱ्या विघातक प्रवृत्तींना सत्तेपासून दूर ठेवा व विकासाची आस असणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना येणाऱ्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत निवडून द्या असे आवाहन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.
वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ६ मध्ये ६० लक्ष ०३ हजार रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या आचारी हॉस्पिटल ते छत्रपती श्री. संभाजी महाराज सर्कलपर्यंत रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन, प्र.क्र. ९ मध्ये ४८ लक्ष ८३ हजार रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या छत्रपती श्री. संभाजी महाराज सर्कल ते धारणगाव रोड (नागरे पेट्रोल पंपापर्यंत) रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे व १७ लक्ष ३६ हजार रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या धारणगाव रोड ते बापु वढणे घर रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारकडून कोपरगाव शहराच्या विकासासाठी निधी आणण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नातून कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे व पुढील काळात देखील जेवढा जास्त निधी आणता येईल तेवढा निधी आणण्यासाठी माझे प्रयत्न सुरु राहतील. मागील पाच वर्षात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी विकासाला साथ दिली परंतु मागील सहा महिन्यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी शहरविकासाला खीळ घालण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकाऱ्यांनी विकासकामांना परवानगी दिली असतांना देखील न्यायालयात जावून विकासकामांना स्थगिती मिळवून शहरवासियांना विकासापासून वंचित ठेवले आहे. नागरिकांना खड्ड्यातून जावे लागले, धुळीचा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे जनतेचा वाढत असलेला रोष पाहून सत्ताधाऱ्यांना उशिरा शहाणपण सुचले मात्र सत्ताधाऱ्यांच्या मनमानीमुळे जनतेचे हाल झाले. विकासासाठी आलेला निधी खर्च करू शकत नसणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आता घरी बसवा व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व उमेदवारांना निवडून देवून सत्ता द्या असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले.
यावेळी महात्मा गांधी जिल्हा चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, गटनेते नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे, सौ. प्रतिभा शिलेदार, श्रीमती वर्षा कहार, अजीज शेख, हाजी मेहमूद सय्यद, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, राजेंद्र वाकचौरे, डॉ. अजय गर्जे, संदीप रोहमारे, कृष्णा आढाव, सौ. रेखा जगताप, फकिर कुरेशी, दिनकर खरे, डॉ. तुषार गलांडे, राहुल देवळालीकर, जावेद शेख, चंद्रशेखर म्हस्के, प्रकाश दुशिंग, सचिन परदेशी, अशोक आव्हाटे, बाळासाहेब रुईकर, वाल्मीक लहिरे, धनंजय कहार, डॉ. आतिष काळे, आकाश डागा, ऋषिकेश खैरनार, दिनेश पवार, विकास बेंद्रे, संदीप देवळालीकर, विलास आव्हाड, इम्तियाज अत्तार, अंबादास वडांगळे, नारायण लांडगे, राजेंद्र आभाळे, मुकुंद इंगळे, विलास आव्हाड, योगेश नरोडे, मनोज नरोडे, संतोष शेजवळ, भाऊसाहेब भाबड, श्रेणीक बोरा, महेश उदावंत, बापू वढणे, रोशन शेजवळ, हारूण शेख, प्रसाद उदावंत, रामदास केकाण, नानासाहेब देवकर, अखिल चोपदार, चांदभाई पठाण, अय्युब कच्छी, विकास आव्हाड, उमेश दीक्षित, विजय दाभाडे, दिपक देशमुख, अकिल चोपदार, दिनेश संत, जाकीर शेख, विजय नागरे, अझर शेख, नितीन शिंदे, ए. जी. लोंगाणी, पाटील साहेब, सतीश कृष्णानी, पप्पू लोंगानी, प्रदीप गुरली, सुमेर पुरोहित, वेदप्रकाश लोंगानी, जोगेंद्र भुसारी, दिपाली क्षीरसागर, लिना येवले, नेहा कराचीवाला, लता लोंगानी, सुजाता गांधी, मनिषा कृष्णानी, रेणुका कृष्णानी, सुरेखा बिबवे, आरती शिंदे, छायाताई फरताळे, बेबीआपा पठाण, सौ. अश्विनी गायकवाड, सौ. विमल मेढे, भारती भाबड, सौ. योगिता वाघमारे, सौ. नंदा लासुरे, सौ.मनिषा बाविस्कर, सौ.भाग्यश्री आघाडे, सौ. किरण चव्हाण, सौ. सत्यभामा गायकवाड, सौ. माधवी वढणे, सौ. वैभवी वढणे, मंजुषा पंडित, सौ. रेखा कुशीन, सौ. रत्ना मोरे, सौ. आशा रोकडे, सौ. माया सानप, सौ. पुष्पा नाईक, सौ.स्मिता गुरली, सौ.कल्पना लासुरे, ज्योती पांडे, शकुंतला मोरे योगेश नरोडे, शुभम लासुरे, मनोज नरोडे, संतोष शेजवळ, शंकर घोडेराव, पुरुषोत्तम पगारे, भूषण पाटील, रोहित भाबड, कमलेश जाधव, रंगनाथ डूबे, चांदभाई पठाण, डॉ. राजेंद्र रोकडे, गजानन वाकचौरे, पांडे भाभी, विकास आव्हाड, उमेश दीक्षित, ओंकार वढणे, मनोज शुक्ला, अशोक नाईक, गायकवाड सर, बाबुराव शुक्ला, रणधीर सर, प्रकाश कांबळे, अमोल सानप, वाघ सर, विकास खालकर, बाळासाहेब लासुरे, सचिन गवळी, पगारे साहेब, डुकरे सर, विशाल गुरली, नितीन जाधव, कमलेश जाधव, आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments