आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

२८ विकासकामांना कोर्टात नेतांना नागरिकांना विश्वासात घेतले होते का? – सुनील गंगुले


२८ विकासकामांना कोर्टात नेतांना नागरिकांना विश्वासात घेतले होते का? – सुनील गंगुले



कोपरगाव प्रतिनिधी:----- शहराची तहान भागविण्यासाठी मैलाचा दगड ठरणारा पाच नंबर साठवण तलाव व वितरीकांबाबत गल्लोगल्ली फिरून संभ्रम निर्माण करण्याचे काम विरोधक करीत आहे. त्या विरोधकांनी २८ विकासकामांना स्थगिती मिळविण्यासाठी हि २८ कामे कोर्टात नेतांना शहरातील नागरिकांना विश्वासात घेतले होते का? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी केला आहे. 

श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी पाच नंबर साठवण तलाव व वितरीकांसाठी १२० कोटीची तांत्रिक मंजुरी मिळविली आहे. पाच नंबर साठवण तलावाचे पुढील काम तातडीने पूर्ण होऊन शहराचा पाणीप्रश्न कायमचा मार्गी लागावा यासाठी त्यांचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र विरोधक जाणून बुजून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत असल्याचा आरोप गंगुले यांनी केला आहे. विरोधकांना कोपरगाव शहराच्या बाजारपेठेला उर्जितावस्था आणण्याचे वक्तव्य हे पुतना मावशीचे प्रेम आहे. त्यांना जर बाजारपेठेची एवढी काळजी होती तर त्यांनी २८ विकासकामांना विरोध केलाच नसता.  


जर त्यांनी विरोध केला नसता तर शहरातील रस्त्यांची कामे दिवाळीच्या अगोदरच पूर्ण झाली असती व दिवाळीच्या खरेदीला ग्रामीण नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन बाजारपेठेला आर्थिक चालना मिळाली असती. मात्र खराब रस्त्यांमुळे बाहेर गावातील नागरिक कोपरगाव शहरात आले नाही त्याचा फटका छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना बसला. व यापुढेही शहरविकासात आडकाठी घालण्याचे काम विरोधकांकडून सुरु आहे. पाच नंबर साठवण तलावाचा प्रश्न आ.आशुतोष काळे मार्गी लावत असून पाच नंबर तलावामुळे नागरिकांना नियमितपणे पाणीपुरवठा होणार आहे.  त्यामुळे विरोधक पाच नंबर साठवण तलाव व वितरीकांबाबत गल्लोगल्ली फिरून संभ्रम निर्माण करीत मात्र येणाऱ्या निवडणुकीत शहरातील नागरिक कोल्हे गटाच्या नगरसेवकांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही असे गंगुले यांनी म्हटले आहे

Post a Comment

0 Comments