आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

दिव्यांगाचे सर्व प्रश्न प्राधान्याने सोडविणार– आ. आशुतोष काळे

  दिव्यांगाचे सर्व प्रश्न प्राधान्याने सोडविणार– आ. आशुतोष काळे

         कोपरगाव प्रतिनिधी:---  दिव्यांग बंधू भगिनींना देखील त्यांचे दैनंदिन जीवन सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे जगता यावे. त्यांच्या मनात विश्वास निर्माण करून त्यांचे सर्व प्रश्न प्राधान्याने सोडविणार असल्याचे श्री साईबाबा संस्थान आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे. जिल्हा रुग्णालय अहमदनगर व कोपरगाव ग्रामीण रुग्णालय यांच्या वतीने आयोजित कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात  दिव्यांग बंधू-भगिनींसाठी तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या तपासणी शिबिरास श्री साईबाबा संस्थान आ. आशुतोष काळे यांनी भेट देत दिव्यांग बंधू-भगिनींची आस्थेवाईकपणे चौकशी केली.

         यावेळी ते म्हणाले की, दिव्यांग बंधू-भगिनींना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळविण्यासाठी शासनाचे अपंगत्व प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक असून हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दिव्यांग बंधू-भगिनींना अहमदनगर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी जावे लागत होते. त्यामुळे आर्थिक अडचणी बरोबरच इतरही अडचणी येत होत्या. त्यासाठी दिव्यांग बंधू-भगिनींना दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी अहमदनगर येथे जाण्यासाठी वाहनाची मोफत व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे अनेक दिव्यांग बंधू-भगिनींनी आपली तपासणी केली होती. मात्र अजूनही अनेक दिव्यांग बंधू-भगिनी शासकीय अपंगत्व प्रमाणपत्रापासून वंचित होत्या. त्यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ  व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. राजश्रीताई घुले यांना तालुकास्तरावर दिव्यांग बंधू-भगिनींची तपासणी शिबीर आयोजित करावे अशी विनंती केली होती. त्या विनंतीची पालकमंत्री व जिल्हा परिषद अध्यक्षा यांनी दखल घेवून तालुकास्तरावर तपासणी शिबीर आयोजित केले आहे. त्यामुळे यापुढे दिव्यांग बंधू-भगिनींची होणारी गैरसोय दूर झाली आहे. यापुढे एकही दिव्यांग बंधू-भगिनी शासकीय अपंगत्वाच्या  प्रमाणपत्रापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व प्रकारची मदत करून शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देणार असल्याचे श्री साईबाबा संस्थान आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

               यावेळी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे व्हा. चेअरमन सुधाकर रोहोम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले,नगरसेवक मंदार पहाडे, संदीप पगारे, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, हाजीमेहमूद सय्यद, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, फकीर कुरेशी, प्रकाश दुशिंग, इम्तियाज अत्तार, वाल्मिक लहिरे, संतोष बारसे, मनोज नरोडे, डॉ. गोकुळ घोगरे, डॉ. विजय गुरवले, डॉ. संतोष रासकर, डॉ. श्रीकांत पाठक, डॉ. अशोक कराळे, डॉ. कृष्णा फुलसुंदर, डॉ. अमित नाईकवाडे, डॉ. आतिष काळे, डॉ. जितेंद्र रणदिवे, आरोग्य सहायक सचिन जोशी आदी मान्यवरांसह दिव्यांग बंधू-भगिनी उपस्थित

Post a Comment

0 Comments