आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून शिर्डी नगरपंचायत “नगरपरिषद” अधिसूचना प्रसिद्ध

 संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून

शिर्डी नगरपंचायत “नगरपरिषद” अधिसूचना प्रसिद्धकोपरगाव प्रतिनिधी:---  शिर्डी ग्रामस्थांची अनेक वर्षापासूनची शिर्डी नगरपंचायतीचे रुपांतर शिर्डी नगरपरिषदेत व्हावे अशी मागणी होती. त्याबाबत शिर्डीतील ग्रामस्थ व शिष्टमंडळासह राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर नुकतीच बैठक घेतली आहे. या बैठकीतून सकारात्मक निर्णय होऊन शिर्डी नगरपंचायतीला नगरपरिषद करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे नूतन अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

  अहमदनगर जिल्ह्यातील काही नगरपंचायतीच्या निवडणूक प्रक्रिया सुरु असून यामध्ये शिर्डी नगरपंचायतीचा देखील समावेश आहे. परंतु मागील अनेक वर्षापासून शिर्डीची लोकसंख्या वाढत जाऊन ती ३१ हजार पार झाली आहे. त्यामुळे या शिर्डी नगरपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रुपांतर व्हावे अशी स्थानिक ग्रामस्थांची अनेक वर्षापासूनची मागणी होती. साईबाबा संस्थानचे नूतन अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांचे महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेले वजन पाहता गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रमेश गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते, भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, दीपक वारुळे यांनी अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांची भेट घेऊन शिर्डी नगरपंचायतीचे रुपांतर शिर्डी नगरपरिषदेत करण्यासाठी त्यांना साकडे घातले होते.अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी शिर्डी ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्याशी बैठक घेऊन चर्चा केली. त्यांना निवेदन देत शिर्डी नगरपंचायतीचे रुपांतर शिर्डी नगरपरिषदेत करण्याची मागणी केली. त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत नगरविकास खात्याने शिर्डी नगरपंचायतीला नगरपरिषदेचा दर्जा देणेबाबत तातडीने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. तसेच या अधिसूचनेबाबत शिर्डी ग्रामस्थांना कोणताही आक्षेप असेल तर आज (दि.३) पासून ३० दिवसाच्या आत आपला लेखी आक्षेप जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदविणे आवश्यक असल्याचे सदरच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शिर्डी ग्रामस्थांच्या अनेक वर्षापासूनच्या शिर्डी नगरपंचायतीला नगरपरिषद करण्याच्या मागणीला साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून निश्चितपणे चालना मिळाली आहे. त्यामुळे शिर्डी ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून अनेक वर्षापासूनच्या मागणीला अध्यक्ष आ.आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून चालना मिळाल्यामुळे शिर्डी ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहे. तातडीने निर्णय घेऊन अधिसूचना प्रसिद्ध केल्याबद्दल साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे.

Post a Comment

0 Comments