आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

गोवंशहत्या करणाऱ्या कसायांइतकेच शहरात जनावरे सोडणारेही नागरिकांसाठी घातकच-- विजय वहाडणे.

 गोवंशहत्या करणाऱ्या कसायांइतकेच शहरात जनावरे सोडणारेही नागरिकांसाठी घातकच-- विजय वहाडणे. कोपरगाव प्रतिनिधी :----- आज वसू बारस काही जण  मुक्या प्राण्यांना शहरात कचरा-खरकटे खाण्यासाठी सोडून देतात.अनेकदा कॅरीबॅग,प्लास्टिक इ.कचरा खाऊन जनावरे मरतातही.रहदारीला अडथळे येतात-अपघात होतात.  तरीही काही बेजबाबदार-मुर्ख मालक गोवंश शहरात सोडून देतात.

            गोवंशहत्या करणाऱ्या कसायांइतकेच शहरात जनावरे सोडणारेही नागरिकांसाठी घातकच आहेत. अशी संतप्त भावना नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे यात पुढे म्हटले आहे की,शहरात फिरणारी जनावरे जप्त केली तरी निर्ढावलेले काहीजण  पुन्हा पुन्हा नियम कायदे पायदळी तुडवितांना दिसत आहेत.
         नगरपरिषदेच्या प्रशासनाने किती वेळा तेच तेच काम करायचे.आधीच नगरपरिषदेकडे अधिकाऱ्यांची- कर्मचाऱ्यांची वाणवा असतांना दैनंदिन कामे करणेही अवघड होऊन जाते.जनतेनेही जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे.  जनावरांच्या मालकांनी आपापली जनावरे बांधून ठेवून त्यांचे व्यवस्थित संगोपन करावे ही नम्र अपेक्षा व विनंती.  गोपालकांनो लक्षात घ्या वसुबारस आहे आज गायी वासरे सुरक्षित ठेवा वाटू द्या थोडी तरी लाज असेही  नगराध्यक्ष विजय वहाडणे शेवटी म्हणाले .
Post a Comment

0 Comments