आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

अकरा गावातील रस्त्यांची दुर्दशा हटवणार – आ. आशुतोष काळे

 अकरा गावातील रस्त्यांची दुर्दशा हटवणार – आ. आशुतोष काळेकोपरगांव प्रतिनिधी:----- कोपरगाव विधानसभा मतदार संघाला जोडलेल्या राहाता तालुक्यातील अकरा गावातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. रस्त्यांचा अनुशेष मोठा असून हां अनुशेष मोठा असला तरी तो भरून काढणे शक्य आहे. त्यामुळे मतदार संघाचा प्रतिनिधी या नात्याने या अकरा गावातील रस्त्यांची दुर्दशा हटवून नागरिकांना येणाऱ्या रस्ते, वीज आणि पाण्याच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी राहाता तालुक्यातील वाकडी येथे केले.


कोपरगाव विधानसभा मतदार संघाला जोडलेल्या राहाता तालुक्यातील वाकडी येथे ३ कोटी २५ लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या वाकडी-रामपूरवाडी-पुणतांबा (प्रजिमा८७) रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण तसेच २४ लक्ष निधीतून वाकडी स्मशानभूमी ते किसनराव कोते घर, एकनाथ शेळके घर ते अमोल लहारे घरापर्यंत करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन तसेच जिल्हा नियोजन अंतर्गत व महावितरण एसीएफ योजनेतून दिलेल्या १०० केव्हीए ट्रान्सफार्मर लोकार्पण आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, वाकडीचे सरपंच संपतराव शेळके, रामपूरवाडीचे सरपंच संदीप सुरडकर, पुणतांब्याचे माजी सरपंच मुरलीधर थोरात, जळगावचे सरपंच शिवाजी साबदे, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप लहारे, बाळासाहेब भोरकडे, प्रभाकर येलम, अरुण बोंबले, अशोकराव काळे, चंद्रशेखर लहारे, शंकरराव लहारे,शिवाजीराव जगताप उपस्थित होते.

 पुढे बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, मतदार संघाच्या विकासासाठी जो निधी मिळवीन त्यामध्ये या अकरा गावांचा देखील तेवढाच वाटा आहे. संपूर्ण मतदार संघातील रस्त्यांची अवस्था वाईट आहे.त्याला हि अकरा गावे देखील अपवाद नाहीत. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या आणि विजेच्या देखील समस्या आहेत. महाविकास आघाडी सरकारने निळवंडे कालव्यांसाठी ४७० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे निळवंडेच्या कामाला वेग आला असून निळवंडेचे पाणी या अकरा गावात पोहोचताच पाण्याची समस्या निश्चितपणे मार्गी लागणार आहे. वाकडी गावचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी पाणी पुरवठा योजनेसाठी शेती महामंडळाची जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. गणेशनगर-श्रीरामपूर रस्त्यावरील पुलासाठी ९० लक्ष रुपये निधी तरतूद करण्यात आली असून निविदा प्रक्रिया पूर्ण होवून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. विजेच्या बाबतीत मागणीनुसार ट्रान्सफार्मर उपलब्ध करून देवून अजूनही रस्त्यांसाठी निधी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. अनेक दिवसांचा रस्त्याचा प्रश्न सोडविल्याबद्दल वाकडी पुणतांबा रामपूरवाडी ग्रामस्थांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले.

यावेळी सुनील कुरकुटे भाऊसाहेब शेळके राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय गोर्डे,बाळासाहेब शेळके, विरेश शेळके, सुरेश लहारे, प्रफुल्ल शेळके, भाऊसाहेब लहारे, प्रताप कोते, निलेश लहारे, अमोल शेळके, किशोर कोते, संजय कोते, महेश जाधव, बबलू लहारे, विनायक देठे, दीपक वेताळ, निलेश कोते, दिलीप चौधरी, कल्याणराव सदाफळ, शंकरराव चौधरी, जालिंदर कोते, विजयराव सदाफळ, शिवाजी साबदे, भाऊसाहेब अहिरे, अनिल रक्टे, सुभाष कापसे, अनिल पाडांगळे, विठ्ठलराव शेळके,रुपेश काले,कैलास पानसरे, अल्ताफ तांबोळी, जाकीर शेख, सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता प्रशांत वाकचौरे आदींसह महसूल,वीज वितरणचे कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments