संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या १० विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड- श्री अमित कोल्हे
आपल्या विध्यार्थ्यांना नोकरदार करण्यासाठी संजीवनी आघाडीवरकोपरगांव प्रतिनिधी:----- संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या वर्षातील अंतिम सत्रातील ८ विद्यार्थ्यांची टीई कनेक्टिव्हीटी तर २ विद्यार्थ्यांची कॅप्जेमिनी या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नोकऱ्यांसाठी निवड केली आहे, सदर निवडीचे नेमणुक पत्रे संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत निवड झालेल्या विध्यार्थ्यांना सन्मान पुर्वक देण्यात आली. यावेळी विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरील भाव व आनंद संजीवनीच्या प्रयत्नांना कृतज्ञता करणारा व्यक्त करणारा होता, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की मागील तीन-चार दशकात महाराष्ट्रात भुछत्रासारखे इंजिनिअरींग काॅलेज उदयाला आली, मात्र तेथुन बाहेर पडलेले सर्वच विद्यार्थी नोकऱ्यांसाठी नामांकित कंपन्यांच्या कसोटीत बसत नाही. यावार उपाय म्हणुन संजीवनी इंजिनिअरींगच्या काॅलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेेसमेंट डीपार्टमेंटच्या पुढाकाराने कंपनी व इंजिनिअरींग शाखा निहाय अभिप्रेत असलेले आधुनिक शिक्षण दिले जात असल्याने संजीवनीच्या विद्यार्थ्यांचे नोकरदार होण्याचे स्वप्ने पुर्ण होत आहे.
अलिकडेच टीई कनेक्टिव्हीटी या कंपनीने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधिल मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या ८ विद्यार्थ्यांचे नेमणुकीचे पत्र दिले आहे. यात महेंद्र प्रताप दुबे, संकेत अरूण वहाडणे, रोहीत संजय सोनवणे, प्रथमेश संतोश देशमुख, मानसी बाळासाहेब खोंड, स्नेहल सदानंद पाटील, प्रसाद भरत मुताळे, व वैभव नारायण गमे यांचा समावेश आहे. तर कप्जेमिनी या कंपनीने इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगच्या मोहीन अस्पर सय्यद व सत्यम उत्तम मुळे या दोघांची निवड केली आहे.
एका पाठोपाठ नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची निवड होत असल्याने आणि ग्रामिण भागातील विद्यार्थी कमावते होत असल्याने माजी मंत्री श्री शंकरराव कोल्हे यांनी समाधान व्यक्त करून विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले आहे. तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनीही विद्यार्थी, पालक, संस्थेचे डायरेक्टर डाॅ. ए.जी. ठाकुर व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डीपार्टमेंटच्या सर्व टीमचे अभिनंदन केले आहे.
0 Comments